विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातल्या भ्रष्टाचाराची जोडले गेलेले UPA हे नाव टाकून विरोधकांनी INDIA हे नवीन नाव धारण केले. त्याची घोषणा आज बंगलोरमध्ये विरोधी ऐक्याच्या बैठकीनंतर सर्व विरोधकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली. पण या पत्रकार परिषदेला विरोधी ऐक्यासाठी स्वतःहून पुढाकार घेतलेल्या नेत्या UPA चेअर पर्सन सोनिया गांधी मात्र हजर राहिल्या नाहीत. त्यामुळे नव्या INDIA बाबत आघाडीच्या नेतृत्वाबाबत दाट संशय तयार झाला आहे.
आजच्या बैठकीत नव्या आघाडीच्या 11 सदस्यांच्या समन्वय समितीची केवळ घोषणा करण्यात आली. पण ते सदस्य अद्याप नेमले नाहीत. तसेच नव्या आघाडीच्या संयोजकाचीही नेमणूक झाली नाही. ही नेमणूक आणि नवे 11 सदस्य INDIA च्या
मुंबईतील बैठकीत नेमण्यात येतील, असे मल्लिकार्जुन खर्गे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
या पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पत्रकारांना ब्रीफिंग दिले. त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पत्रकारांना संबोधित केले.
– उद्धव ठाकरे पुन्हा येतील
मात्र ममता बॅनर्जी यांच्या निवेदनात उद्धव ठाकरे यांचा उल्लेख आवर्जून आला. उद्धव ठाकरे यांना आपण माजी मुख्यमंत्री मानत नाही. ते पुन्हा येतील. मुख्यमंत्री होतील, असा आशावाद ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला, तसेच शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे पक्षाचे क्रियेटर्स आहेत. आमदार येतील आणि जातील. पण जनता या दोन नेत्यांच्या पाठीशी आहे आणि ते विरोधकांबरोबर आहेत याविषयी मल्लिकार्जुन खर्गे यांनी समाधान व्यक्त केले.
दिल्ली आणि पाटण्यात 18 पक्ष विरोधकांच्या ऐक्यात सामील झाले होते. परंतु ते पुरेसे नव्हते हे लक्षात घेऊन स्वतः सोनिया गांधी यांनी बंगलोरच्या विरोधी ऐक्याच्या बैठकीसाठी पुढाकार घेऊन सर्व विरोधकांची जमवाजमव केली आणि बैठकीला 26 पक्षांचे नेते हजर ठेवले. या बैठकीचे नेतृत्व स्वतः सोनिया गांधींनी केले.
पण INDIA नव्या विरोधी आघाडीच्या पहिल्या पत्रकार परिषदेला मात्र हजर न राहता सोनिया गांधी निघून गेल्या, तसेच त्यांच्या खालोखाल जेष्ठत्व असलेल्या शरद पवारांना मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्वतः शेजारी बसवून घेतले. पण या पत्रकार परिषदेत निवेदन करण्याची संधी पवारांना दिली नाही.
अशा INDIA चॅलेंज करण्याची हिंमत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालच्या भाजप आणि NDA मध्ये आहे का??, असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला. पण विरोधी ऐकण्यासाठी सकारात्मक आणि परिणामकारक पुढाकार घेणाऱ्या सोनिया गांधीच पत्रकार परिषदेला हजर नसल्याने आघाडीच्या नेतृत्वाबाबतची शंका आणि संशय अधिक गहिरा झाला.
Sonia Gandhi absent from INDIA’s first official press conference
महत्वाच्या बातम्या
- विरोधी ऐक्यासाठी जमले होते 26 पक्ष, आज NDAच्या बैठकीला 38 पक्षांचा सहभाग
- संशयाचे पडळ घेऊन शरद पवार आज बंगलोरच्या विरोधी ऐक्याच्या बैठकीत!!
- एसबीआयचा अहवाल- महापुरामुळे देशात तब्बल 15 हजार कोटींचे नुकसान, 92 टक्के जनता विमाच काढत नाही
- दिल्लीतील अधिकारांच्या लढाईवर घटनापीठ करणार सुनावणी, सुप्रीम कोर्टाचा नायब राज्यपाल- मुख्यमंत्र्यांना मिळून काम करण्याचा सल्ला