• Download App
    Sonali Phogat: सोनाली फोगट हत्येप्रकरणी पाचवी अटक, हे चारही आरोपी आधीच पोलिसांच्या ताब्यात|Sonali Phogat Fifth arrest in Sonali Phogat murder case, all four accused already in police custody

    Sonali Phogat: सोनाली फोगट हत्येप्रकरणी पाचवी अटक, हे चारही आरोपी आधीच पोलिसांच्या ताब्यात

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भाजप नेत्या आणि सोशल मीडिया स्टार सोनाली फोगटच्या हत्येप्रकरणी गोवा पोलिसांनी पाचवी अटक केली आहे. गोवा पोलिसांनी आरोपी रामा मांद्रेकरला अटक केली आहे. मांद्रेकर यांच्यावर पॅडलर दत्तप्रसाद गावकर यांना ड्रग्ज पोहोचवल्याचा आरोप आहे, त्यानंतर गावकर यांनी सुधीर सांगवानला ड्रग्ज विकले.Sonali Phogat Fifth arrest in Sonali Phogat murder case, all four accused already in police custody



    याप्रकरणी गोवा पोलिसांनी आतापर्यंत ज्या पाच जणांना अटक केली आहे. त्यात गोव्यातील कर्लीज रेस्टॉरंटचा मालक एडविन न्युन्स, ड्रग्ज तस्कर दत्त प्रसाद गावकर आणि रामा मांद्रेकर याशिवाय मुख्य आरोपी सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग यांचा समावेश आहे. पोलिसांनी शनिवारी कर्लीज रेस्टॉरंटच्या टॉयलेटरीजमधून सिंथेटिक ड्रग्स जप्त केले होते, त्यानंतर रेस्टॉरंटच्या मालकाला अटक करण्यात आली होती. त्याचवेळी ड्रग पॅडलर दत्तप्रसाद गावकर याला शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली.

    पोलिसांनी काल दोन मुख्य आरोपींसह चार आरोपींना गोव्याच्या म्हापसा कोर्टात हजर केले होते, तेथून त्यांना 10 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.

    Sonali Phogat Fifth arrest in Sonali Phogat murder case, all four accused already in police custody

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    RBI New Guidelines 2026 : कर्ज वसुली एजंट आता ग्राहकांना त्रास देऊ शकणार नाहीत; RBI कठोर मार्गदर्शक तत्त्वे आणणार

    India Wins : भारताने सहाव्यांदा अंडर-19 वर्ल्डकप जिंकला; इंग्लंडचा 100 धावांनी पराभव, वैभव सूर्यवंशीच्या 175 धावा

    Actor Rajpal Yadav : अभिनेता राजपाल यादवने केले सरेंडर; चेक बाउंस प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आत्मसमर्पण