वृत्तसंस्था
मुंबई : भाजपमधून तृणमूल काँग्रेस मध्ये जाऊन लोकसभेचे खासदार बनलेले बॉलिवूडचे एकेकाळचे सुपरस्टार शत्रुघ्न सिन्हा आता नवीन आरोपांच्या जाळ्यात सापडले आहेत. बिग बॉस 5 फेम नटी पूजा मिश्रा हिने शत्रुघ्न सिन्हा, पूनम सिन्हा आणि सोनाक्षी सिन्हा या सिन्हा कुटुंबावर सेक्स स्कॅमचे आरोप केले आहेत. माझी वर्जिनिटी विकून शत्रुघ्न सिन्हा यांनी सोनाक्षी सिन्हाला स्टार बनवले, असा खळबळजनक आरोप तिने केला आहे. Sonakshi made a star by selling my virginity
आम्ही लोखंडवाला कॉम्प्लेक्स मध्ये राहायचो. माझे वडील आणि शत्रुघ्न सिन्हा हे अतिशय जवळचे मित्र होते. परंतु पूनम सिन्हा यांनी माझ्या वडिलांच्या मनावर बॉलिवूड मध्ये फक्त वेश्याच काम करू शकतात ही वाईट गोष्ट ठसवली. काही वर्षांनी आम्ही पुण्याला शिफ्ट झालो. माझ्या वडिलांनी मला बॉलिवूडमध्ये काम करायला परवानगी दिली नाही. शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांनी माझ्यावर काळी जादू केली. माझ्यावर ड्रग्सचे विविध प्रयोग करून सेक्स स्कॅम केले. त्यामुळे माझे करिअर बॉलिवूडमध्ये बहरू शकले नाही. माझ्या ऐवजी सोनाक्षी सिन्हाला त्यांनी कायम पुश केले. किंबहुना मी तिच्या पुढे निघून जाईन या भीतीने त्यांनी मला वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या मार्गाने अडवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप पूजा मिश्रा हिने सिन्हा कुटुंबीयांवर केला आहे.
– सलमान अरबाज वर आरोप
याआधी तिने सलमान खान अरबाज खान यांच्यावर आपल्यावर त्यांनी 8 वेळा बलात्कार केल्याचा आरोप केला होता. बिग बॉस 5 सीजन मध्ये पूजा मिश्रा गाजली होती. सलमानने बिग बॉस मध्ये आपल्याला उशिरा बोलावल्याचा आरोप तिने केला होता आणि आता तिने तृणमूल मध्ये जाऊन नव्याने खासदार झालेल्या शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या कुटुंबावर केलेल्या आरोपांमुळे अधिकच प्रसिद्धी मिळवली आहे.
Sonakshi made a star by selling my virginity
महत्वाच्या बातम्या