वृत्तसंस्था
चेन्नई : नव्या संसद भवनात प्रतिष्ठापना झालेला सेंगोल अर्थात राजदंड तयार केलाय तरी कोणी??, त्याचा इतिहास रोमांचकारी आहे. हा सिंगल भारतीय परंपरेतील सम्राट चोल यांचा हा राजदंड आहे. स्वर्गात जसे न्यायावर आधारित राज्य प्रस्थापित आहे, तसेच न्यायाचे राज्य पृथ्वीवर करण्याचा हा भगवान शिवाने चोलवंशीय राजांना दिलेला हा आदेश आहे. हा राजदंड नव्या संसदेत स्थापित केला जाईल. Someone has created the Sengol to be installed in the new Parliament House
14 ऑगस्ट 1947 रोजी तमिळ पंडितांकडून स्वतः पंडित नेहरूंनी स्वीकारलेला हा सेंगोल राजदंड वुम्मीडी बंगारू शेट्टी यांनी घडविला आहे. त्यांचे वंशज अमरेंद्र जितेंद्र वुम्मीडी यांनी ही माहिती दिली आहे. हा चेन्नई सिंगुल या नावाने देखील ओळखला जातो.
या सेंगोलवर सुवर्णाचा नंदी प्रस्थापित असून तो कष्ट आणि समृद्धीचे प्रतिक आहे. त्याचबरोबर भारतीय स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून या सेंगोलवर भारतीय ध्वज देखील अंकित केला आहे. मूळचा चांदीचा हा सेंगोल असून त्यावर सोन्याचा वर्ख लावला आहे. नव्या संसद भवनात लोकसभेत सभापतींच्या आसना शेजारी हा सेंगोल राजदंड उभा प्रस्थापित केला.
Someone has created the Sengol to be installed in the new Parliament House
महत्वाच्या बातम्या