मध्यंतरी म्हणजे 2018 मध्ये #मी टू ही मोहीम फार गाजली होती. बॉलिवूड मधल्या सेलिब्रिटींनी बॉलिवूडमध्ये काही विशिष्ट गटांकडून आपले लैंगिक शोषण कसे होते हे सांगण्यासाठी याविषयी ही मोहीम चालवली होती. त्यात काही गोष्टी जेन्युईन होत्या. पण बऱ्याच गोष्टी नंतर फेक असल्याचे सिद्ध झाले. इथे प्रश्न #मी टू किंवा #नॉट विदाऊट मी हा नाही. ही मोहीम देशात राबवली गेली ही वस्तुस्थिती आहे. Some are fearful about their political irrelevance in maharashtra state politics
पण #मी टू आणि #विदाऊट मी या शीर्षकाचा महाराष्ट्राशी काय संबंध?? विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणाशी तरी काय संबंध??, हा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही… पण त्या अर्थाने #मी टू मोहिमेचा #विदाऊट मी या गोष्टीची तसा संबंध नाही… तो वेगळ्या अर्थाने आहे!!
महाराष्ट्रात एखादी घडामोड घडली आणि त्यातही ती सरकारशी संबंधित असेल तर ती माझ्याशिवाय कशी घडू शकेल?? ही मानसिक अस्वस्थता अनेकांना फार पूर्वीपासून जाणवत आली आहे. मी प्रत्येक ठिकाणी पाहिजेच प्रत्येक ठिकाणी माझा हात असला पाहिजेच हा आग्रह जोपासण्यातून #नॉट विदाऊट मी ही मोहीम नव्हे, तर मानसिक अवस्था आलेली दिसत असते. माझ्याशिवाय एखादी गोष्ट घडू शकते, याच्यावर ज्यांचा विश्वास बसत नाही किंवा जे विश्वास ठेवू इच्छित नाहीत त्यांच्याविषयी #नॉट विदाऊट मी ही मानसिक अवस्था न बोलताही बरेच काही “सांगून” जाते!!
काल रात्री अचानक मराठी प्रसार माध्यमांमध्ये बातमी झळकली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सिल्वर ओकवर शरद पवारांच्या भेटीला जाऊन पोहोचले. त्याचा फोटोही व्हायरल झाला. बाकीच्या माध्यमांनी विश्वास ठेवून तशा बातम्या छापल्या. टीव्हीवर दाखवल्या. त्यानंतर तब्बल 12 तासांनी एकनाथ शिंदे यांनी स्वतःच खुलासा केला की अशी काही भेट झाली नाही आणि कोणती चर्चाही झाली नाही. पण सिल्वर ओक मधल्या शिंदे – पवार भेटीची बातमी तब्बल 12 तास महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात राहिली. नेमका इथेच #नॉट विदाऊट मी नावाच्या मानसिक अवस्थेचा संबंध येतो. महाराष्ट्रात नवीन सरकार आल्यानंतर आपला “पॉलिटिकल रेलेव्हन्स” अर्थात राजकीय संदर्भमूल्य संपते की काय??, ही भीती मराठी माध्यमांसह अनेकांना वाटत आहे आणि मग त्यासाठी या ना त्या प्रकारे माध्यमांच्या बातम्यांमध्ये “राहण्याचे” प्रयत्न केले जात आहेत. त्यातही “चाणक्य” ही प्रतिमा मराठी प्रसार माध्यमांनी बनवल्यामुळे त्या प्रतिमेच्या कसोटीवर वारंवार खरे उतरावे लागते… मग करायचे काय?? तर शेवटी या माध्यमांनाच हाताशी धरून काहीबाही करावे लागते.
मग कोणी माध्यमे पुड्या सोडत राहतात. किंबहुना पुड्या सोडाव्या लागतात. या पुड्या जितक्या जास्त वेळ हवेत राहतात, तितका #नॉट विदाऊट मी हा मानसिक आनंद भोगता येतो… मग प्रत्यक्षात ती घटना घडली असो अथवा नसो… मानसिक समाधान तर मिळवता येते. असा हा #नॉट विदाऊट मी प्रकार आहे.
जशी #मी टू या मोहिमेतून बॉलीवूड मधल्या सेलिब्रिटींनी आपल्यावरच्या अन्यायाला वाचा फोडली, तसेच वेगळ्या पद्धतीचे #नॉट विदाऊट मी या भावनेतून “बातमीत राहिल्या”चे आणि आपले राजकीय संदर्भमूल्य टिकून असल्याचे समाधान मिळत असावे!! बाकी काही नाही!!
Some are fearful about their political irrelevance in maharashtra state politics
महत्वाच्या बातम्या
- होय, रिक्षावाले असल्याचा आम्हाला अभिमान!!; फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना चोख प्रत्युत्तर
- वीर सावरकरांच्या प्रखर हिंदुत्वावरच सरकार चालणार!!; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भूमिका
- अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिन परेडमध्ये गोळीबार : शिकागोत इमारतीच्या छतावरून हल्लेखोराने केला अंदाधुंद गोळीबार; 6 ठार, 31 जखमी
- नौदलात अग्निवीर होण्यासाठी 3 दिवसांत 10 हजार महिलांची नोंदणी, 15 जुलैपासून ऑनलाइन अर्जांना सुरुवात