विशेष प्रतिनिधी
मुंबई : पंतप्रधान सूर्य घर : मोफत वीज योजनेअंतर्गत निवासी घरांच्या छतांवर सौर यंत्रणा बसविण्याच्या उपक्रमाला देशभरात वेग आला असून, देशातील एकूण छतावरील सौर यंत्रणांपैकी जवळपास 20 % सौर यंत्रणा महाराष्ट्रात असून, या बाबतीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर 2025 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत महाराष्ट्रात 1,08,327 घरांमध्ये छतावरील सौर यंत्रणा बसवण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून ही माहिती दिली.solar energy revolution; State leads in Pradhan Mantri Surya Ghar Yojana; Solar systems installed on 1,08,327 houses in 5 months!
या कामगिरीमुळे महाराष्ट्राने उत्तर प्रदेश (95,665), गुजरात (94,364) आणि आंध्र प्रदेश (30,915) यांसारख्या मोठ्या राज्यांनाही मागे टाकले आहे.
विशेष म्हणजे महाराष्ट्रात छतावर सौर प्रकल्प बसविणाऱ्यांची संख्या राजस्थान (39,484), आसाम (24,728), छत्तीसगड (19,203) आणि ओडिशा (17,564) या चार राज्यांच्या एकत्रित 1,00,979 स्थापनेपेक्षाही जास्त आहे. तसेच केरळ (36,836), मध्य प्रदेश (21,563), हरियाणा (13,781), उत्तराखंड (11,575) आणि जम्मू-काश्मीर (9,214) या पाच राज्यांच्या एकत्रित स्थापनेपेक्षाही महाराष्ट्र पुढे आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या उपक्रमाद्वारे देशात स्वच्छ, शाश्वत आणि परवडणाऱ्या ऊर्जेच्या वापराला चालना मिळत असून, नागरिकांच्या घराघरात सौरऊर्जेचा प्रसार वेगाने होत आहे. महाराष्ट्राने या मोहिमेत अग्रस्थान मिळवत स्वच्छ ऊर्जा स्वीकारात देशाला दिशा दिली आहे
solar energy revolution; State leads in Pradhan Mantri Surya Ghar Yojana; Solar systems installed on 1,08,327 houses in 5 months!
महत्वाच्या बातम्या
- विलीनीकरणाच्या विषयाला जयंत पाटलांकडून पुन्हा उकळी; भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जायची तडफड दिसली!!
- महाराष्ट्रात घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा नाही, LPG चे वाढविले उत्पादन; छगन भुजबळांची माहिती
- राहुल गांधींचा कांशीरामांच्या राजकीय वारसावर डल्ला; उत्तर प्रदेशातले काँग्रेसचे सगळे Political Icons संपले??
- Vijay Wadettiwar : जनगणनेत ओबीसींचा वेगळा रकाना टाकावा; विजय वडेट्टीवार यांची मागणी