• Download App
    समाजवादी अत्तराचा व्यापारी पीयूष जैनवर छापेमारी सुरूच, आतापर्यंत 257 कोटींची रोकड आढळली । Socialist perfume trader Piyush Jain continues to be raided, cash worth Rs 257 crore found so far

    समाजवादी अत्तराचा व्यापारी पीयूष जैनवर छापेमारी सुरूच, आतापर्यंत २५७ कोटींची रोकड आढळली

     Piyush Jain : परफ्युम व्यावसायिक पीयूष जैन यांच्या घरावर छापे अद्याप सुरूच असून सातत्याने नवनवीन खुलासे होत आहेत. ताज्या माहितीनुसार, छाप्यादरम्यान कन्नौजमधील व्यापारी पीयुष जैन यांच्या घरातून बॅगेत 300 चाव्या सापडल्या. पीयूष जैन याने एकाच कॅम्पसमध्ये चार घरे बांधली असून एक तळघरही आहे, अशीही माहिती मिळत आहे, आता हे तळघर उघडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पीयूष जैनवर आतापर्यंत टाकलेल्या छाप्यांमध्ये २५७ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. Socialist perfume trader Piyush Jain continues to be raided, cash worth Rs 257 crore found so far


    वृत्तसंस्था

    लखनऊ : परफ्युम व्यावसायिक पीयूष जैन यांच्या घरावर छापे अद्याप सुरूच असून सातत्याने नवनवीन खुलासे होत आहेत. ताज्या माहितीनुसार, छाप्यादरम्यान कन्नौजमधील व्यापारी पीयुष जैन यांच्या घरातून बॅगेत 300 चाव्या सापडल्या. पीयूष जैन याने एकाच कॅम्पसमध्ये चार घरे बांधली असून एक तळघरही आहे, अशीही माहिती मिळत आहे, आता हे तळघर उघडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पीयूष जैनवर आतापर्यंत टाकलेल्या छाप्यांमध्ये २५७ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

    आणखी दोन-तीन दिवस कारवाई सुरू राहणार

    कन्नौजमधील परफ्युम व्यापारी पियुष जैन यांच्या घरावर आयकर आणि जीएसटी गुप्तचर विभागाचे छापे सुरू आहेत. कानपूरमधून 177 कोटींच्या जप्तीनंतर आता सर्वांच्या नजरा कन्नौजच्या घराकडे लागल्या आहेत की इथून नोटांचा किती मोठा खजिना बाहेर येणार आहे. कन्नौजमधील घरातून काय सापडले आहे, याबाबत सध्या कोणतीही माहिती नाही. कनौजमधील जैन स्ट्रीट परिसरातील अरुंद गल्ल्यांमध्ये व्यापारी पीयूष जैन यांचे घर बांधले आहे. त्यातच जीएसटी आणि आयकर विभागाचे छापे अद्याप थांबलेले नाहीत. सर्वात मोठी बातमी म्हणजे १७७ कोटींच्या नोटा मिळाल्यानंतरही हा छापा आणखी २-३ दिवस चालणार आहे. तरीही घराचे एक गेट सोडले तर इतर सर्व दरवाजे बंद आहेत. CGST कायदा 2017 च्या कलम 67 चा उल्लेख करणारी प्रत्येक गेटवर सीलबंद नोटीस चिकटवण्यात आली आहे.

    देशभरात चर्चा

    यूपी निवडणुकीपूर्वी हा छापा यूपीमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. या घरातून आणखी किती संपत्ती बाहेर पडणार हे जाणून घेण्याची उत्सुकता यूपीतील सर्वसामान्यांपासून ते राजकारण्यांना आहे. त्यामुळे विविध माध्यमे या घराबाहेर तैनात आहेत. काल संध्याकाळीही घरातून तोडफोडीचे आवाज येत होते. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी नोटा लपवून ठेवण्यात आल्या आहेत, त्या ठिकाणी फोडाफोडी सुरू आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी पियुष जैन यांची दोन्ही मुले प्रत्युष जैन आणि मोलू जैन यांनाही घरात आणले आणि त्यांची चौकशी केली जात आहे.

    Socialist perfume trader Piyush Jain continues to be raided, cash worth Rs 257 crore found so far

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!