• Download App
    सोशल मीडिया अराजक, बंदी घालण्याची गरज, आरएसएसचे विचारक एस. गुरुमूर्ती यांची मागणी|Social media chaos, the need for a ban, RSS thinker S. Gurumurthy's demand

    सोशल मीडिया अराजक, बंदी घालण्याची गरज, आरएसएसचे विचारक एस. गुरुमूर्ती यांची मागणी

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: सोशल मीडिया हे अराजक आहे. त्यावर बंदीची गरज असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारक एस. गुरुमूर्ती यांनी व्यक्त केले. चीनने समाजमाध्यमे संपवली आहेत. आपल्याकडेही सर्वोच्च न्यायालयाने समाजमाध्यमांच्या भूमिकेबाबत चिंता व्यक्त केली आहे. तेव्हा आपल्याला बंदी आणावी लागेल.Social media chaos, the need for a ban, RSS thinker S. Gurumurthy’s demand

    फेसबुकशिवाय आपण राहू शकणार नाही काय असा सवालही त्यांनी केला.राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त प्रेस कौन्सील ऑफ इंडियातर्फे आयोजित कार्यक्रमात बोलताना गुरूमूर्ती म्हणाले, समाजमाध्यमांमुळे म्यानमार, श्रीलंकेत अशांतता निर्माण झाल्याची उदाहरणे आहेत.



    बंदी घालणे कठीण वाटत असले तरी अराजकता रोखलीच पाहिजे. प्रेस कौन्सीलने या मुद्दय़ावर सखोल अभ्यास करावा.प्रेस कौसिलचे जयशंकर गुप्ता व गुरबिर सिंग यांनी गुरुमूर्ती यांच्या सूचनेला विरोध केला. प्रत्येक काळात एक माध्यम असते.

    समाजमाध्यमाच्या अनेक सकारात्मक बाबी असल्याचे गुरबिर यांनी नमूद केले. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्याचे स्थान आहे हे स्वीकारलेच पाहिजे असे त्यांनी सांगितले. त्रिपुरातील पत्रकारांना झालेल्या अटकेबाबत गुरुमूर्ती यांनी मौन बाळगल्याबद्दल शुक्ला यांनी सवाल केला.

    Social media chaos, the need for a ban, RSS thinker S. Gurumurthy’s demand

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    President Murmu : राष्ट्रपती मुर्मूंनी पाणबुडी INS वाघशीरमधून प्रवास केला, असे करणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती

    Lucknow : लखनौमध्ये शियांचे अधिवेशन, मौलाना म्हणाले- वंदे मातरमच्या नावाखाली घाबरवले जातेय, पाकसारखी वागणूक मिळतेय

    Mohan Bhagwat : भागवत म्हणाले- संघाचे ध्येय हिंदू समाजाला एकत्र करणे, सनातन धर्म पुन्हा जिवंत करण्याची वेळ आली आहे