वृत्तसंस्था
इंफाळ : मणिपूरमध्ये दोन महिलांची विवस्त्रावस्थेत धिंड काढण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. #ManipurViolence सह सोशल मीडियावर हे व्हिडिओ पोस्ट केले जात आहेत.Social activists cross the line in Manipur, strip 2 women; Allegation of gang rape, FIR filed after video went viral
इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरम (ITLF) ने आरोप केला आहे की दोन महिलांवर शेतात सामूहिक बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी महिला आयोग आणि एसटी आयोगाकडे कारवाईची मागणी संघटनेने केली आहे. पीडित दोन्ही महिला कुकी जमातीतील असल्याचा फोरमचा दावा आहे.
आयटीएलएफने सांगितले की, व्हिडिओमध्ये जमाव असहाय महिलांचा विनयभंग करताना दिसत आहे. महिला रडत आहेत आणि अपहरणकर्त्यांकडे विनवणी करत आहेत.
ही घटना 4 मे रोजी इंफाळपासून 35 किमी अंतरावर असलेल्या कांगपोकपी जिल्ह्यात घडली. इंटरनेट बंदीमुळे हा व्हिडिओ तेव्हा समोर येऊ शकला नाही. याप्रकरणी पोलिसांनी केला गुन्हा दाखल केला आहे.
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि अलका लांबा यांनी या घटनेचा निषेध केला आहे.
मणिपूर प्रकरणातील एफआयआरमध्ये काय आहे…
4 मे रोजी दुपारी 3च्या सुमारास कांगपोकपी जिल्ह्यातील आमच्या बी. फीनोम गावात सुमारे 800-1000 लोक आले. त्यांनी घरांची तोडफोड केली. घरे पेटवून देऊन घरातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, भांडी, कपडे आणि रोख रक्कम लुटून नेली.
आम्हाला संशय आहे की हल्लेखोर मेईतेई युथ ऑर्गनायझेशन, मेईतेई लिपुन, कांगलीपाक कानबा लुप, आरामबाई टेंगोल आणि वर्ल्ड मेईतेई कौन्सिल, अनुसूचित जमाती मागणी समितीचे होते.
हल्लेखोरांच्या भीतीने बरेच लोक जंगलात पळून गेले, त्यांना नॉन्गपोक सेकमाई पोलिसांनी वाचवले. हल्लेखोरांकडे अनेक शस्त्रेही होती. सर्व लोकांची पोलिसांच्या ताब्यातून सुटका केली.
त्यांनी 56 वर्षीय सोइटिंकम वायफेईची हत्या केली. यानंतर तीन महिलांचे जबरदस्तीने कपडे काढण्यात आले. हल्लेखोरांनी महिलांवर सामूहिक बलात्कार केला. एका महिलेच्या भावाने आपल्या बहिणीला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु हल्लेखोरांनी त्याचा बळी घेतला.
पोलिसांचा तपास – आरोपींचा शोध सुरू
मणिपूर पोलिसांनी सांगितले- व्हायरल व्हिडिओमध्ये दोन महिला गर्दीत कपड्यांशिवाय दिसत आहेत. याप्रकरणी नांगपोक सकमाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोपींचा शोध सुरू आहे.
मेईतेई समाजाला एसटीचा दर्जा मिळाल्यानंतर संघर्षाला सुरुवात
3 मे रोजी मणिपूरमधील मेईतेई आणि कुकी जमातींमध्ये मेईतेई समुदायाला एसटीचा दर्जा देण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाविरोधात संघर्ष झाला. आतापर्यंत येथे हिंसाचार सुरू आहे. मणिपूर हिंसाचारात आतापर्यंत 160 लोकांचा मृत्यू झाला आहे. जुलै महिन्यातच 10 जणांचा मृत्यू झाला आहे.
Social activists cross the line in Manipur, strip 2 women; Allegation of gang rape, FIR filed after video went viral
महत्वाच्या बातम्या
- कर्नाटक विधानसभेतून भाजपचे 10 आमदार निलंबित; भाजप आणि जेडीएसने अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव ठेवला
- द फोकस एक्सप्लेनर : 11 पक्षांचे 91 खासदार NDA आणि ‘I.N.D.I.A.’ दोन्हींपासून अंतर राखून, तेच किंगमेकर बनणार? वाचा सविस्तर
- ऑस्ट्रेलियन समुद्रकिनाऱ्यावर सापडलेली ‘त्या’ रहस्यमयी वस्तूबाबत ‘ISRO’ प्रमुख सोमनाथन यांचं मोठं विधान, म्हणाले…
- व्हिडिओ कांडात अडकलेल्या किरीट सोमय्यांच्या मदतीला आले जितेंद्र आव्हाड!!