प्रतिनिधी
नाशिक : देशात हिंदुत्ववाद्यांचे नाही, तर हिंदूंचे सरकार आणायचे आहे, असे वक्तव्य काल काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी जयपूरच्या महागाई हटाव रॅलीमध्ये केले होते. त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना टोला लगावला आहे.So what country do Africans currently rule in?
या देशात हिंदूंचे राज्य आणायचे आहे, असे राहुल गांधी म्हणतात. मग सध्या येथे काय आफ्रिकन लोक राज्य करताहेत का!!?, अशा शब्दात राज ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
त्याच वेळी राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळा बद्दल शुभेच्छा दिल्या. शरद पवार हे सर्व व्याधींवर मात करून ज्या पद्धतीने महाराष्ट्रभर फिरतात त्याची प्रशंसा केली पाहिजे. चांगल्याला चांगले म्हटले पाहिजे, असे उद्गार राज ठाकरे यांनी काढले.
एसटी कर्मचाऱ्यांचा संपाबाबत त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना इशारा दिला. लोकांवर अरेरावी करण्यासाठी तुम्हाला राज्यावर बसवलेले नाही. एसटी कर्मचारी संघटनांची झेंडे बाजूला ठेवून एकवटले आहेत त्यांच्या मागण्या रास्त आहेत त्या मान्य केल्या पाहिजेत, असे ते म्हणाले.
ओबीसींच्या आरक्षणाचा विषय आत्ताचा का आला? निवडणुका जवळ आल्या की आपल्या पुढाऱ्यांना जाती-पातीचे विषय सुचतात. मूळ विषय बाजूला पडतात. या लोकांना या पुढाऱ्यांना महाराष्ट्राला जाती पातीबाहेर येऊच द्यायचे नाही, असा आरोपही राज ठाकरे यांनी केला. औरंगाबादला जाण्यापूर्वी ते नाशिक मध्ये काही वेळ थांबले होते त्यावेळी त्यांनी पत्रकारांना संबोधित केले.
So what country do Africans currently rule in?
महत्त्वाच्या बातम्या
- काशी विश्वनाथ कॉरिडॉर उद्घाटन : हर हर महादेवच्या गजरात पंतप्रधान मोदींचे काशीवासीयांकडून स्वागत; गंगा मातेचेही दर्शन
- Narendra Modi in Varanasi : काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं लोकार्पण; पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर
- CONGRATULATIONS INDIA : २१ वर्षांनंतर भारताला ‘Miss Universe’चा किताब ! हरनाज कौर संधूनं पटकावलं विजेतेपद