विशेष प्रतिनिधी
दिल्ली : दिल्लीमधील वायू प्रदूषण हा गंभीर विषय आहे. भारतातील प्रमुख शहरांपैकी सर्वात जास्त प्रदुषण दिल्लीमध्ये आहे. नुकताच सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकारला आदेश दिला आहे. वायू प्रदूषण कंट्रोल करण्यासाठी दोन दिवसांचा लॉक डाऊन जाहीर करण्यात यावा. आणि एयर पोल्यूशन कंट्रोल करण्यासाठी तातडीने योग्य ती पावले उचलण्यात यावीत. असा आदेशही कोर्टाने दिला आहे.
‘So two days lock down announced ….’; Judge Raman expressed concern over air pollution in Delhi
चीफ जस्टिस एन वी रमण यांनी याबाबत बोलताना म्हटले, एअर क्वालिटी इंडेक्स 500 वरून किमान 200 पॉइंट्सने तरी कमी झाला पाहिजे. आणि याच्यासाठी तुम्ही दोन दिवसांचा लॉक डाऊन पुरेसा आहे का? अशा प्रदूषित वातावरणात येथील लोक कसे जगतील? हे पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी तातडीने लवकरात लवकर पावले उचलली पाहिजेत. येथील लोकांना आता घरामध्ये देखील मास्क घालून बसावे लागत आहे.
वायू प्रदूषणात जगात दिल्लीचा पहिला क्रमांक; प्रदूषणास शेजारील राज्ये अधिक जबाबदार
पंजाब आणि हरियाणा मधील गहू आणि मक्याच्या पिकांच्या शेतातील वाळलेले तन जाळून टाकल्यामुळे दिल्ली मधील प्रदूषणामध्ये वाढ होत आहे. पीक घेतल्यानंतर दरवर्षी शेतकरी शेतातील उरलेले तन जाळून टाकतात. यासाठी लागणारी आधुनिक मशिन शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेरची आहेत. त्यामुळे दिल्ली गव्हर्नमेंटने त्या मशीन्स शेतकर्यांना देण्यात यावीत असा आदेश कोर्टाने दिला आहे. जेणेकरून हवा प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.
दिल्ली म्हटले थंडीमध्ये धुक्याचा देखील खूप मोठा प्रॉब्लेम असतो. त्यामुळे तेथील शाळांना सुट्या दिल्या जातात. त्यामुळे शाळा सुरू करण्याबाबत देखील कोर्टाने चिंता व्यक्त केली आहे.
‘So two days lock down announced ….’; Judge Raman expressed concern over air pollution in Delhi
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील हिंसाचाराचे पाकिस्तानी कनेक्शन? आतापर्यंत 100 हून अधिक एफआयआर, 25 जणांना अटक, वाचा सविस्तर…
- रझा अकादमी म्हणजे काय? : धार्मिक प्रकाशन करणारी संस्था ते दंगलींपर्यंतचा प्रवास, आझाद मैदानाची दंगल ते सध्याचा हिंसाचार, वाचा सविस्तर…
- बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे ; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
- “ज्यांनी जे काम केले आहे त्यांना त्याचे श्रेय त्यांनाच दिले पाहिजे” – अजित पवार
- कोल्हापूर विमानतळावरील अनियमित विमानसेवेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी