• Download App
    आसाम मध्ये बालविवाहा विरोधात सरकारची कठोर कायदेशीर कारवाई; 2258 लोकांना अटक; ओवेसी - अजमलांचा सरकार विरोधी आवाज So far 4074 cases registered across Assam related to child marriages while 8134 people identified as accused.

    आसाम मध्ये बालविवाहा विरोधात सरकारची कठोर कायदेशीर कारवाई; 2258 लोकांना अटक; ओवेसी – अजमलांचा सरकार विरोधी आवाज

    वृत्तसंस्था

    गुवाहाटी : आसाम मध्ये मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने बालविवाहा विरोधात कठोर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. राज्यामध्ये बालविवाहांचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड वाढले. त्यातून अनेक सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत. So far 4074 cases registered across Assam related to child marriages while 8134 people identified as accused.

    या पार्श्वभूमीवर हेमंत विश्वशर्मा यांच्या सरकारने सामाजिक सुधारण्याचे एक महत्त्वाचे पाऊल म्हणून बालविवाह विरोधात कठोर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. 4074 लोकांविरुद्ध पोस्को अर्थात बालकांवरील लैंगिक अत्याचार विरोधी कायदा या कायद्याअंतर्गत राज्यातल्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये एफआयआर नोंदवून त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली असून आत्तापर्यंत पोलिसांनी 2258 जणांना अटक केली आहे.

    हेमंत विश्वशर्मा यांच्या सरकारने सामाजिक सुधारणेचे हे पाऊल उचलताच एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी आणि आसाम मधल्या युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे नेते बदलुद्दिन अजमल यांनी सरकार विरोधात जोरदार टीकास्त्र सोडले आहे. आसामचे सरकार मुस्लिमांविरुद्ध टार्गेटेड कारवाई करत असल्याचे आरोप या दोन्ही नेत्यांनी केले आहेत. ज्यांचे बालविवाह झाले आहेत, अशा मुलींसंदर्भात आसाम सरकार कोणती भूमिका घेणार आहे?, असा सवाल ओवैसी यांनी केला आहे. बालविवाहांच्या विरोधात कारवाई करण्यापेक्षा आसाम सरकारने मुलींसाठी शाळा उघडल्या पाहिजे होत्या. पण तशा शाळा किती उघडल्या?, असाही सवाल ओवैसी यांनी केला आहे.

    तर बद्रुद्दिन अजमल यांनी सरकारच्या हेतूविषयी शंका उपस्थित केली आहे. आसाम मध्ये मुसलमानांविरोधात हे सरकारी अत्याचार आहेत. सरकार हिंदू – मुसलमानांमध्ये भेदभाव करत आहे. मुसलमानांसाठी कोणतीही कल्याणकारी योजना सुरू करण्याऐवजी आसाम सरकार मुसलमानांच्या हिताविरुद्ध काम करत आहे, असा आरोप बद्रुद्दिन अजमल यांनी केला आहे.

    हेच ते बद्रुद्दिन अजमल आहेत, ज्यांनी काहीच दिवसांपूर्वी हिंदू समाजातील पुरुषांनी मुसलमान समाजाच्या पुरुषांना फॉलो करावे आणि जास्तीत जास्त मुले पैदा करावीत, असा सल्ला दिला होता. त्यांचा पक्ष युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटने आसाम मध्ये टोपी आणि लुंगीचे राज्य आणण्याची घोषणा केली होती. आता याच बद्रुद्दिन अजमल यांनी आसाम सरकारने पुढाकार घेऊन सुरू केलेल्या बालविवाहाच्या विरोधातील कायदेशीर कारवाईला विरोध केला आहे.

    So far 4074 cases registered across Assam related to child marriages while 8134 people identified as accused.

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!