वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि त्यांच्या मुलीवर काँग्रेस नेत्यांनी नुकतेच गंभीर आरोप केले आहेत. पण याचबाबत आता दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेस नेत्यांना दणका दिला आहे. इराणी आणि त्यांच्या मुलीवर आरोप करण्यात आलेले ट्विट डिलीट करण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टाने काँग्रेस नेत्यांना दिले आहेत. Smriti Irani’s daughter accused of running a bar; Delete tweets within 24 hours
न्यायालयाचे आदेश
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीच्या मालकीचे गोव्यात एक रेस्टॉरंट असून त्यात अवैधरित्या मद्यालय चालवणात येत असल्याचा आरोप काँग्रेस नेते जयराम नरेश, पवन खेरा आणि नेट्टा डिसूजा यांनी ट्वीट करत केला होता. याविरोधात स्मृती इराणी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. शुक्रवारी न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेस नेत्यांना फटकारले आहे.
आरोप केलेले संबंधित ट्वीट 24 तासात डिलीट करण्यास सांगत, 18 ऑगस्ट रोजी या खटल्याच्या सुनावणीसाठी हजर राहण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने जयराम नरेश, पवन खेरा आणि नेट्टा डिसूजा यांना दिले आहेत.
काँग्रेसचे आरोप
स्मृती इराणी यांची कन्या जोईश इराणी त्यांचं गोव्यात सिली सोल्स कॅफे अँड बार नावे एक रेस्टॉरंट असून त्याव बेकायदेशीररित्या मद्यालय सुरू असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे. त्यामुळे इराणी यांची तात्काळ केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणीही काँग्रेस नेत्यांनी केली आहे.
पण हे आरोप निराधार असून आपली आणि आपल्या मुलीची बदनामी करण्यासाठी हे आरोप करण्यात येत असल्याचे स्मृती इराणी यांनी म्हटले आहे. त्यामुळे यासंदर्भात माफी मागण्यासाठी इराणी यांनी संबंधित काँग्रेस नेत्यांना नोटीस बजावली आहे.
Smriti Irani’s daughter accused of running a bar; Delete tweets within 24 hours
महत्वाच्या बातम्या
- पुण्यातील 50 कोटींच्या शिक्षक भरती घोटाळ्याची ईडी चौकशी, बनावट कागदपत्रांच्या आधारे 23 जणांची भरती
- वार-पलटवार : राऊत म्हणाले- शिंदे गटाचे काही आमदार संपर्कात, शिंदे म्हणाले- राऊतांना सत्तांतराचे स्वप्न पाहू द्या!
- राष्ट्रपत्नी अश्लाघ्य टिपण्णी : काँग्रेस नेत्यांचे नेमके राजकीय – सामाजिक दुखणे काय??
- आदित्य ठाकरेंच्या शिवसंवादानंतर आता एकनाथ शिंदेंचा महाराष्ट्रात शक्तिप्रदर्शन दौरा!!