• Download App
    स्मृती इराणींच्या गाडीवर अंडीफेक; राष्ट्रवादी कार्यकर्तीला मारहाण; भाजपच्या तिघांविरुद्ध गुन्हे दाखल!!; सुप्रिया सुळेंची हात तोडण्याची भाषा!!Smriti Irani's car eggthrow; Beating of a NCP activist; Crimes filed against three BJP members

    स्मृती इराणींच्या गाडीवर अंडीफेक; राष्ट्रवादी कार्यकर्तीला मारहाण; भाजपच्या तिघांविरुद्ध गुन्हे दाखल!!; सुप्रिया सुळेंची हात तोडण्याची भाषा!!

    प्रतिनिधी

    मुंबई : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या गाडीवर अंडीफेक… आंदोलनकर्त्या राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्तीला मारहाण… भाजपच्या तीन कार्यकर्त्यांविरुद्ध ताबडतोब गुन्हे दाखल… आणि त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांची हात तोडण्याची भाषा… हा घटनाक्रम आहे!! Smriti Irani’s car eggthrow; Beating of a NCP activist; Crimes filed against three BJP members

    केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या सोमवारी पुण्यात झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्मृती इराणी यांच्या गाडीवर अंडी फेकली. याप्रकरणी विशाखा गायकवाड या कार्यकर्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्ती वैशाली नागवडे यांना मारहाण झाल्याची घटना घडली.



    या घटनेवरुनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे संतापल्या आणि त्यांनी हात तोडण्याची भाषा वापरली. यापुढे जर कुठल्याही महिलेवर हात उगारण्याचा प्रयत्न झाला तर मी हात तोडून हातात देईन, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

    काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

    भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्तीला केलेली मारहाण तुम्ही पाहिलीत का? ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू, फुले, आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. त्यांनी आपल्याला महिलांचा सन्मान करायला शिकवले आहे. त्यामुळे आजनंतर जर महाराष्ट्रात कुठल्याही पुरुषाने कुठल्याही महिलेच्या अंगावर हात उचलण्याचा प्रयत्न केला. तर मी त्याच्या विरोधात केस करीन. त्याचे हात तोडून हातात देईन, अशी भाषा वापरत सुप्रिया सुळे यांनी आपला राग व्यक्त केला आहे.

    Smriti Irani’s car eggthrow; Beating of a NCP activist; Crimes filed against three BJP members

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    देशी गायींचे संवर्धन करुनच खऱ्या अर्थाने शेतीला, शेतकऱ्यांना स्वयंपूर्णतेकडे नेऊ शकतो – देवेंद्र फडणवीस

    इंदिरा गांधींची आठवण काढून काँग्रेसने मोदींना टोचले; पण शशी थरूर + चिदंबरम यांनी मोदींच्या निर्णयाला वाखाणले!!

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!