• Download App
    Smriti Irani asked Lassiwala if anyone from the Gandhi family had come. He said yes Rahul and Priyanka Gandhi had come!

    लस्सीवाल्याला स्मृति इराणी यांनी विचारले गांधी परिवारातील कोणी आले होते का? त्याने सांगितले हो राहूल आणि प्रियंका गांधी आले होते!

    विशेष प्रतिनिधी

    अमेठी : अमेठीच्या खासदार आणि केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृति इराणी यांनी मतदारसंघाच्या दौऱ्यात एका लस्सी दुकानात थांबून लस्सी पिली. दुकानदाराशी गप्पा मारताना त्यांनी विचारले की गांधी परिवारातील कोणी येथे लस्सी प्यायला आले होते का? त्यावर राहूल आणि प्रियंका गांधी आले होते, असे दुकानदाराने सांगितले. Smriti Irani asked Lassiwala if anyone from the Gandhi family had come. He said yes Rahul and Priyanka Gandhi had come!

    अमेठी येथील अशरफी लाल लस्सी कॉर्नर प्रसिध्द आहे. आपल्या दौऱ्यात स्मृति इराणी लस्सी पिण्यासाठी तेथे गेल्या. यावेळी त्यांनी लस्सी दुकानदाराशी संवाद साधला.



    अमेठी येथे इराणी यांच्या हस्ते ऑक्सिजन प्रकल्प, कॉम्प्युटर लॅब आणि विद्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी त्या म्हणाल्या, स्वातंत्र्यापासून आत्तापर्यंत गांधी परिवारातील लोक अमेठीमधून निवडून येत आहेत. येथील लोकांच्या जीवावरच राजकारणात चमकत आहेत. परंतु, या भागाच्या विकासासाठी त्यांनी कधीही प्रयत्न केला नाही. मी अमेठीमध्ये राहत असो की नसो माझ्या मनात सतत अमेठीचा विचार असतो.

    अमेठी हे माझे कुटुंब आहे. कुटुंबाची काळजी कशी घ्यावी याची मला पूर्ण माहिती आहे. आत्तापर्यंत या भागात साधा ऑक्सिजनचा प्रकल्पही उभारला गेला नव्हता. मी सतत अधिकाऱ्यांकडून अमेठीच्या विकासाची माहिती घेत असते. येथील लोकांना समस्या राहणार नाहीत, यासाठी प्रयत्न करत असते.

    Smriti Irani asked Lassiwala if anyone from the Gandhi family had come. He said yes Rahul and Priyanka Gandhi had come!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka’s Janave : कर्नाटकातील जानवे वाद- महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कर्मचारी निलंबित; जानव्यामुळे विद्यार्थ्याला सीईटीच्या पेपरला बसण्यापासून रोखले

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त