वृत्तसंस्था
नवी दिल्ली : सरकारी दूरसंचार कंपनी ITI लिमिटेडने आंतरराष्ट्रीय मानकांनुसार लॅपटॉप आणि मायक्रो पीसी विकसित करून बाजारात आणले आहेत. ‘स्मॅश’ ब्रँड अंतर्गत लॉन्च केलेली दोन्ही उत्पादने आधीच बाजारात पोहोचली आहेत. Acer, HP, Dell आणि Lenovo सारख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकून ITI ने अनेक निविदाही जिंकल्या आहेत.Smash Now state-owned company to compete with foreign companies, ITI launches laptops and micro PCs
या बातमीनंतर कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या अपर सर्किटसह 149.40 रुपयांवर बंद झाले. वर्षभरापूर्वी यावेळी हा शेअर 86 रुपयांवर होता.
कार्बन उत्सर्जन कमी करण्यातदेखील योगदान
आयटीआयने इंटेल कॉर्पोरेशनच्या सहकार्याने लॅपटॉप आणि मायक्रो पीसी विकसित केले आहेत. आयटीआयचा दावा आहे की, त्यांचा लहान आकाराचा पीसी इतर कोणत्याही वैयक्तिक संगणकाप्रमाणे गणना करण्यास सक्षम आहे आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यातदेखील योगदान देतो. त्याचे 12,000 पेक्षा जास्त PC आधीच यशस्वीपणे काम करत आहेत.
ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे
ITIचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश राय यांनी सोमवारी सांगितले की, स्मॅश ब्रँडला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि तीव्र स्पर्धात्मक बाजारपेठेत सौदे जिंकण्यास मदत करत आहे. कंपनीने अलीकडेच केरळ इन्फ्रा आणि टेक्नॉलॉजी फॉर एज्युकेशनकडून दोन निविदा जिंकल्या आहेत, ज्या अंतर्गत केरळमधील शाळांना 9,000 लॅपटॉप तयार करून दिले जाणार आहेत.
Smash Now state-owned company to compete with foreign companies, ITI launches laptops and micro PCs
महत्वाच्या बातम्या
- चिनी परराष्ट्र मंत्र्यांनंतर चिनी संरक्षण मंत्रीही “गायब”; शी जिनपिंगांचे वर्चस्व पडतेय ढिल्ले, म्हणून आवळतोय फास!!
- पक्ष रजिस्टर झाला नाही म्हणून फक्त मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठकीत बाजू मांडून बाहेर आलो; संभाजीराजांचा खुलासा
- राजस्थान काँग्रेस आमदाराचे गेहलोत सरकारला खुले आव्हान, म्हणाले ”मला किंवा मुलाला तिकीट दिले तरच…”
- हिंदू धर्म नष्ट करणारे नष्ट होतील, हिंदू धर्म कधीच नष्ट होणार नाही – देवेंद्र फडणवीस