भ्रष्टाचार प्रकरणी जामीनावर असणारे ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम आणि त्यांचे पुत्र कार्ती यांना मंगळवारी (दि. 18) दिल्ली उच्च न्यायालयाने हलका धक्का दिला. सीबीआयचे म्हणणे मान्य करत कनिष्ठ न्यायालयाच्या कार्यवाहीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. Small blow to senior Congress leader P. Chidambaram and his son Karti in INX media corruption case
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचार प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाच्या निकालाला दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या प्रकरणी टांगती तलवार असणाऱ्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम आणि त्यांचा पुत्र कार्ती यांना हा धक्का मानला जात आहे. Small blow to senior Congress leader P. Chidambaram and his son Karti in INX media corruption case
आरोपी चिदंबरम, कार्ती आणि त्यांच्या वकिलांना भ्रष्टाचार प्रकरणी पोलिस ठाण्याच्या भांडारात ठेवलेले दस्ताऐवज तपासण्याची परवानगी आरोपींनी कनिष्ठ न्यायालयात मागितली होती. त्यावर न्यायालयाने आरोपींना भांडारातील दस्ताऐवज तपासण्यास देण्याचा आदेश सीबीआयला दिला होता.
कनिष्ठ न्यायालयाच्या या आदेशाला सीबीआयने उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर न्यायाधीश सुरेश कुमार यांनी चिदंबरण आणि अन्य आरोपींना नोटिस काढून उत्तर मागवले आहे. विशेष न्यायाधिशांनी 5 मार्च 2021 ला दिलेला आदेश रद्द करण्याची मागणी सीबीआयने केली होती. कनिष्ठ न्यायालयाचा हा आदेश सीबीआयच्या चौकशी प्रक्रियेत घुसखोरी करणारा आहे. आरोपींना पोलिसांच्या भांडारातील दस्तावेज तपासणीसाठी उपलब्ध करून दिल्यास चौकशीवर परिणाम होईल. आरोपी पुरावे नष्ट करण्याची शक्यता आहे, असा युक्तीवाद सीबीआयने केला होता.
भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या 14 आरोपींपैकी केवळ कार्ती यांनीच दस्ताऐवजांच्या मागणीसाठी अर्ज केला होता. मात्र कनिष्ठ न्यायालयाने सर्वच आरोपींना दस्ताऐवज पाहण्याची परवानगी दिली, असेही सीबीआयच्या वकिलांनी उच्च न्यायालयास सांगितले.
डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना पी. चिदंबरम त्यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री होता. तेव्हा सन 2007 मध्ये आयएनएक्स मीडिया समूहाला तब्बल 3 हजार 35 कोटी रुपयांचा विदेशी निधी प्राप्त करायचा होता. ही विदेशी गुंतवणूक देशात होत असताना गुंतवणुकीसंदर्भातले सर्व नियम बाजूला ठेवून मंजुरी देण्यात आली. या आरोपासंबंधी सीबीआयने 15 मे 2017 रोजी गुन्हा दाखल केला. ईडीनेही मनीलॉंड्रिंगचाही गुन्हा दाखल केला होता. चिदंबरम बाप-बेटे सध्या जामीनावर बाहेर आहेत.
Small blow to senior Congress leader P. Chidambaram and his son Karti in INX media corruption case
महत्वाच्या बातम्या
- आक्रमक सोलापुर पुढे राष्ट्रवादी नमली, उजनीतले पाणी पळवण्याचा आदेश रद्द
- दिवसभरात शेअर बाजारात गुंतवणुकदारांनी कमावले तब्बल तीन लाख कोटी, सेन्सेक्स पुन्हा ५० हजारांच्यावर
- ‘लिव्ह-इन’ संबंध अस्वीकारार्ह असल्याचे पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचे निरीक्षण
- चक्रीवादळाने गुजरातमध्ये रात्रभर हाहाकार, किनारपट्टीवर प्रचंड नुकसान
- पतीला इंजेक्शन न मिळाल्याने सैरभेर झालेल्या पत्नीची जीव देण्याची धमकी, मुख्यमंत्र्यांना व्हिडिओ पाठवल्याने खळबळ
- आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचार प्रकरणी पी. चिदंबरम यांना धक्का