जखमी प्रवाशांची संख्याही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Sleeper bus caught fire on Delhi Jaipur highway 2 including girl died 15 passengers injured
विशेष प्रतिनिधी
गुरुग्राम : दिल्ली-जयपूर महामार्गावर बुधवारी रात्री मोठा अपघात झाला. महामार्गावर एका खासगी स्लीपर बसला अचानक आग लागली. या आगीत दोन प्रवासी जिवंत जळाले. तर १५ प्रवासी गंभीर भाजले. जखमी प्रवाशांना उपचारासाठी मेदांता आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, तेथून काहींना दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. जखमी प्रवाशांची संख्याही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री खासगी स्लीपर बस दिल्ली-जयपूर महामार्गावरून जात होती. दरम्यान, अचानक चालत्या बसने पेट घेतला. प्रवाशांना काही समजण्यापूर्वीच आगीने संपूर्ण बसला कवेत घेतले. यावेळी काही प्रवासी गेटमधून बाहेर आले तर काही प्रवाशांनी खिडक्यांच्या काचा फोडल्या. काही प्रवासी बसमध्ये अडकले होते. महामार्गावरून जाणाऱ्या लोकांनी बसला आग लागल्याचे पाहून पोलिस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली.
बसमध्ये दोन प्रवाशांचे मृतदेह सापडले –
माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवत बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुटका केली. सुमारे १५ प्रवासी भाजले असून पोलीस पथकाने त्यांना रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले. बसमध्ये तपासणी केली असता दोन प्रवाशांचे मृतदेह आढळून आले. पोलीस पथकाने मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले.
Sleeper bus caught fire on Delhi Jaipur highway 2 including girl died 15 passengers injured
महत्वाच्या बातम्या
- केंद्रीयमंत्री प्रल्हाद पटेल यांचा वाहनाला अपघात; तीन जखमी, एकाचा मृत्यू ; जाणून घ्या कसा घडला अपघात?
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी श्रेया बुगडेला पाठवली दिवाळी भेट!
- देशाच्या सीमाभागात नागरिक आणि सुरक्षा व्यवस्थेत सामंजस्य वाढविणार संघ स्वयंसेवक!!; मोदी सरकारच्या भक्कम संरक्षण धोरणाला पूरक भूमिका!!
- उत्तर प्रदेश : अलिगडचे नाव बदलणार! हरिगड ठेवण्याची तयारी सुरू, महापालिकेत प्रस्ताव मंजूर