• Download App
    रस्ते अपघात टाळण्यासाठी गाड्यांमध्ये सेन्सर्स, चालकाची कामाची वेळही आता निश्चित करणार । sleep detection sensors in commercial vehicles nitin gadkari on road accidents

    रस्ते अपघात टाळण्यासाठी गाड्यांमध्ये सेन्सर्स, चालकाची कामाची वेळही आता निश्चित करणार

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशात दरवर्षी लाखो लोकांचा मानवी चुकांमुळे होणाऱ्या अपघातात मृत्यू होतो. हे अपघात आणि मृत्यू टाळण्यासाठी व्यावसायिक आणि अन्य वाहनांमध्ये चालकाला झोप येत असेल तर तशी सूचना देणारे सेन्सर बसविण्याचे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. sleep detection sensors in commercial vehicles nitin gadkari on road accidents

    केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले, केंद्र सरकार याबाबत ठोस निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. व्यवसायिक ट्रक चालकांचा वाहन चालवण्याचा वेळ निश्चित हवा, असे सांगताना गडकरींनी विविध मुद्यावर लक्ष्य वेधले. व्यवसायिक वाहनांच्या चालकाला झोप आल्यास त्याची माहिती देणारं सेन्सर लावण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

    ट्रक चालकाचे तास निश्चित करणार

    वैमानिकांसाठी जसे विमान उड्डाणाचे तास ठरलेले असतात. त्याचप्रमाणे चालकांसाठी ट्रक चालवण्याचे तास निश्चित हवेत. चालक दमल्यामुळे होणारे अपघात टाळतील, असं गडकरींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. ‘युरोपियन मापदंडानुसार व्यवसायिक वाहनांमध्ये सेन्सर लावण्याच्या धोरणावर काम करण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिली आहे. या सेन्सरमुळे चालकाला झोप येत असेल, तर त्याची माहिती मिळते,’ असे त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.

    sleep detection sensors in commercial vehicles nitin gadkari on road accidents

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य