• Download App
    पंजाब मध्ये योगी मुख्यमंत्री असते तर हालात एवढे गंभीर झाले नसते; सिद्धू मूसेवालाच्या वडिलांनी मुख्यमंत्री भगवंत मानना सुनावले|Slain singer Siddhu Moosewala's father said that if Yogi had been the CM of Punjab, the situation in Punjab would have been very different.

    पंजाब मध्ये योगी मुख्यमंत्री असते तर हालात एवढे गंभीर झाले नसते; सिद्धू मूसेवालाच्या वडिलांनी मुख्यमंत्री भगवंत मानना सुनावले

    वृत्तसंस्था

    चंडीगड : प्रख्यात पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या पहिल्या वर्ष श्राद्धाच्या दिवशी पंजाब मध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम झाले. पंजाब मधील सध्याच्या अशांत परिस्थितीवर कठोर भाष्य केले. पंजाब मध्ये योगी आदित्यनाथ यांच्यासारखे मुख्यमंत्री असते, तर आजचे हालात एवढे गंभीर झाले नसते. खलिस्तानवादी अमृतपाल सिंह याच्यावर देखील कारवाई करण्याची हिंमत मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दाखवली नसती. पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिंमत दाखवल्यामुळेच त्याच्याविरुद्ध कारवाई होत आहे, असे खडे बोल बलदेव बलकौर सिंह यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांना सुनावले.Slain singer Siddhu Moosewala’s father said that if Yogi had been the CM of Punjab, the situation in Punjab would have been very different.



    खलिस्तानवादी नेता अमृतपाल सिंह पोलिसांच्या तावडीतून निसटल्यानंतर तो अद्याप हाती आलेला नाही. या पार्श्वभूमीवर पंजाब मध्ये योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री असते तर हालात एवढे गंभीर झाले नसते आणि अमृतपाल सिंह पोलिसांच्या तावडीतून निसटू शकला नसता, असे परखड वक्तव्य देखील बलकौर सिंह यांनी केले आहे.

    येत्या लोकसभा निवडणुकीत पंजाबच्या जनतेला योगी आदित्यनाथ यांच्या पक्षाला मतदान करावेच लागेल, असा गंभीर इशारा बलकौर सिंह यांनी दिला. पंजाब मध्ये आम आदमी पार्टीचे सरकार आल्यानंतर परिस्थिती चिघळल्याकडे त्यांनी इशारा केला.

    Slain singer Siddhu Moosewala’s father said that if Yogi had been the CM of Punjab, the situation in Punjab would have been very different.

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य