• Download App
    देशात यंदा १०३ टक्के पावसाची शक्यता , स्कायमेटने वर्तविला दिलासदायक अंदाज|Sky mate predicts Good monsoon this year

    देशात यंदा १०३ टक्के पावसाची शक्यता , स्कायमेटने वर्तविला दिलासदायक अंदाज

    विशेष प्रतिनिधी 

    नवी दिल्ली : देशात यंदा सरासरीच्या तुलनेत पाऊस १०३ टक्के इतका राहण्याचा अंदाज ‘स्कायमेट’ या खासगी संस्थेने वर्तवला आहे. यामध्ये पाच टक्के कमीअधिक तफावत आढळून येण्याची शक्यता आहे.Sky mate predicts Good monsoon this year

    स्कायमेट या संस्थेने जाहीर केलेल्या माहितीनुसार जूनमध्ये चांगला पाऊस पडेल आणि मुंबईत मॉन्सून वेळेत दाखल होईल. सरासरी ८८०.६ मिलिमीटर पाऊस पडला तर तो सामान्य पाऊस असे गृहीत धरले जाते. मात्र, स्कायमेटचा अंदाजानुसार देशात यंदा ९०७ मिलिमीटर इतका पाऊस पडेल.



    हा अंदाज खरा ठरला तर सलग तिसऱ्या वर्षी देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल.यंदा जुलैमध्ये महाराष्ट्रासह छत्तीसगड, ओडिशा आणि आंध्र प्रदेशात चांगला पाऊस पडणार आहे. तर पूर्वेकडील भागात आणि कर्नाटकामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

    Sky mate predicts Good monsoon this year

    Related posts

     Indian Citizenship : दरवर्षी 2 लाख लोक परदेशात स्थायिक होत आहेत; 5 वर्षांत 9 लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडले

    Shivraj Singh Chouhan : शिवराज यांच्यावर पाक गुप्तचर संस्था ISI कडून हल्ल्याचे इनपुट; गृह मंत्रालयाचे सुरक्षा वाढवण्याचे आदेश

    मोदींच्या भाजपचा नवा धक्का; ब्रेकिंग न्यूज आणि शोध पत्रकारितेचा पापड मोडला!!, भाजपमध्ये मोठ्या बदलाची चुणूक