वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंजाब मधील शेतकरी नेत्यांनी एकत्र येऊन विधानसभा निवडणुका लढवण्यासाठी जो संयुक्त समाज मोर्चा स्थापन करण्याची घोषणा केली आहे, त्याच्याशी शेतकरी आंदोलनात अग्रभागी राहिलेल्या संयुक्त किसान मोर्चाचा काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने देण्यात आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतचे ट्विट केले आहे. SKM issued a clarification that they’ve nothing to do with today’s declaration by some Punjab farmer
संयुक्त किसान मोर्चा राजकारणात सक्रिय नाही. कोणत्याही राजकीय पक्षाला आपले व्यासपीठ वापरू देणार नाही, असे किसान मोर्चाने स्पष्ट केले आहे. त्याच बरोबर 15 जानेवारीला संयुक्त किसान मोर्चाची बैठक होणार आहे. त्यामध्ये पंजाब मधल्या संयुक्त समाज मोर्चा या राजकीय पक्षात ज्या शेतकरी संघटना सहभागी झाल्या आहेत किंवा जे शेतकरी नेते सहभागी झाले आहेत त्यांच्याबाबत नेमकी काय भूमिका घ्यायची?, याचा विचार करण्यात येईल, असे संयुक्त किसान मोर्चाने स्पष्ट केले आहे.
संयुक्त किसान मोर्चा शेतकरी आंदोलनात राकेश टिकैत यांच्या नेतृत्वाखाली अग्रभागी होता, तर संयुक्त समाज मोर्चा हा राजकीय पक्ष गुरुचरण सिंग तौरानी यांच्या नेतृत्वाखाली पंजाब मध्ये आज अस्तित्वात आला आहे. गुरुचरण सिंग तौरानी हे देखील पंजाब मधले मोठे शेतकरी नेते आहेत. पंजाब मधल्या विविध 22 शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन संयुक्त समाज मोर्चा नावाच्या पक्षाची घोषणा केली आहे. हा पक्ष विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत. परंतु या राजकीय पक्षाची संयुक्त किसान मोर्चाचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
SKM issued a clarification that they’ve nothing to do with today’s declaration by some Punjab farmer
महत्त्वाच्या बातम्या
- लष्कराचे मिग-21 विमान कोसळले, पायलटचा मृत्यू
- महाराष्ट्रात कोरोनाचे निर्बंध, रात्री नऊ ते सकाळी सात वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश
- हद्दीत घुसणाऱ्यांनाच नाही सीमेपलीकडील दहशतवाद्यांनाचाही खात्मा करू शकतो, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
- बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्या ब्राम्हणांना शिव्या