- चौकशीसाठी आज हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
विशेष प्रतिनिधी
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) हेमंत सोरेन यांना कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी नवीन समन्स पाठवले आहे. अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली.Sixth summon of ED to Chief Minister Hemant Soren in land scam case
सूत्रांनी सोमवारी सांगितले की, सोरेन यांना मंगळवारी येथील फेडरल एजन्सीच्या कार्यालयात हजर राहून मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) त्यांचे म्हणणे नोंदवण्यास सांगण्यात आले आहे. त्यांना 12 डिसेंबर रोजी म्हणजेच आज फेडरल एजन्सीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने सोरेन यांना बजावलेली ही सहावी नोटीस आहे, परंतु ते एकदाही एजन्सीसमोर हजर झाले नाहीत. अंमलबजावणी संचालनालयाच्या कारवाईपासून संरक्षण मिळावे यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने असा आरोप केला आहे की “झारखंडमध्ये माफियांद्वारे अवैध जमीन मालकी बदलणारी एक मोठी टोळी सक्रिय आहे”.
Sixth summon of ED to Chief Minister Hemant Soren in land scam case
महत्वाच्या बातम्या
- भारत मंडपम येथे आजपासून ‘GPAI समिट’ सुरू होणार, मोदी करणार उद्घाटन!
- छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री विष्णू देव साय मोदींच्या उपस्थितीत उद्या घेणार शपथ
- ब्रिटिश काळातील गुन्हेगारी कायद्यांमध्ये केंद्र सरकाकडून मोठ्या बदलांची तयारी
- कर्नाटकात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे; मुलाने मुलीला पळवले म्हणून त्याच्या आईला विवस्त्र करून खांबाला बांधून मारहाण!!