विशेष प्रतिनिधी
लखनौ : उत्तर प्रदेश, यूपीचा निवडणूक प्रवास आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. आज सहाव्या टप्प्यातील मतदान आहे. विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज १० जिल्ह्यांतील ५७ जागांवर मतदान होत आहे. या टप्प्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह ६७६ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. Sixth phase of polling begins in Uttar Pradesh
आज ज्या जिल्ह्यांमध्ये निवडणुका होणार आहेत त्यात बस्ती, संत कबीरनगर, सिद्धार्थनगर, महाराजगंज, कुशीनगर, देवरिया, गोरखपूर, बलरामपूर, आंबेडकर नगर आणि बलिया यांचा समावेश आहे.आजच्या राजकीय लढाईत यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. मतदानाला सुरुवात झाली आहे.
बलियामध्ये विधानसभेच्या सात जागांसाठी आज मतदान होत आहे. या जागांवर एकूण ८२ उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे. यामध्ये मंत्री उपेंद्र तिवारी, आनंद स्वरूप शुक्ला यांच्याशिवाय सपातील नारद राय, राम गोविंद चौधरी, झियाउद्दीन रिझवी, उमाशंकर सिंग, सुरेंद्र सिंह आदी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
पूजनानंतर योगींनी केले मतदान
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मतदान केले. तत्पूर्वी, योगींनी जनतेला स्वतःला मतदान करण्याचे आवाहन केले. योगी म्हणाले की, मतदान आता निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे. गेल्या ५ वर्षातील विकास प्रकल्प तुम्ही पाहिले आहेत. ‘एम्स’च्या उद्घाटनापासून ते कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत. आता आम्ही आणि दहशतवादाचे समर्थन करणारे लोक यांच्यात निवड करण्याची वेळ आली आहे. तुमचे १ मत यूपीला भारताची नंबर १ अर्थव्यवस्था बनवेल.
गोरखपूर बस्ती मंडळाच्या ४१ विधानसभा जागांसाठी मतदान सुरु आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. कॅम्पियरगंजमध्ये हे जोडपे मतदान करण्यासाठी आले होते.योगी आदित्यनाथ यांनी मतदान करण्यापूर्वी पूजा केली: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सहाव्या टप्प्यात मतदान करण्यापूर्वी गोरखपूरमधील गोरखनाथ मंदिरात पूजा केली.
Sixth phase of polling begins in Uttar Pradesh
महत्त्वाच्या बातम्या
- “कमळाबाई” ते “सापाचं पिल्लू” ;उद्धव साहेब, ठोकताय कुणाला??, भाजपला की आपल्याच वडिलांना??
- भारतीय अभिनेत्री झाली अमेरिकन सैन्यात भरती
- सापाच्या पिल्ला आम्ही ३० वर्षे दूध पाजले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल
- खात्याविषयी प्रश्न आल्यास जेलमध्ये स्क्रिन लावणार का? प्रवीण दरेकर यांचा सवाल
- शाळेत शिकविल्याप्रमाणे आमच्या माहितीप्रमाणे समर्थ रामदासच शिवरायांचे गुरू, रावसाहेब दानवे यांनी केले राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन