मुंबई गुन्हे शाखेने हरियाणातील फतेहाबाद येथून सहाव्या आरोपीला अटक केली आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. मुंबई क्राईम ब्रँचने हरियाणातील फतेहाबाद येथून सहाव्या आरोपीला अटक केली आहे. हरपाल सिंग असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हरपालने आरोपी मोहम्मद रफिक चौधरीला आर्थिक मदत केली होती आणि रेकी करण्यास सांगितले होते.Sixth accused arrested in case of shooting outside Salman Khan’s house
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी या प्रकरणात अटक केलेल्या सर्व आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याची (मकोका) कलमे लावली आहेत.
गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन्ही शूटर्सवर तसेच पंजाबमधून अटक करण्यात आलेल्या दोन शस्त्रास्त्र पुरवठादारांवर ‘मकोका’ लागू करण्यात आला होता. अटक केलेल्या चार आरोपींसोबत, वॉन्टेड गुन्हेगार अनमोल बिश्नोई आणि त्याचा तुरुंगात असलेला भाऊ लॉरेन्स बिश्नोई यांच्यावरही ‘मकोका’ लावण्यात आला होता.
१४ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या विक्की गुप्ता आणि सागर पाल यांनी मुंबईतील वांद्रे भागातील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये असलेल्या सलमान खानच्या घराबाहेर चार राऊंड गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांना गुजरातमध्ये अटक करण्यात आली.
Sixth accused arrested in case of shooting outside Salman Khan’s house
महत्वाच्या बातम्या
- चाबहार बंदर संचालनाचा भारत + इराणमध्ये दीर्घकालीन करार; चीनच्या विस्तारवादाला, पाकिस्तानच्या लुडबुडीला चाप!!
- बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदींचे निधन!
- पंतप्रधान मोदी उमेदवारी अर्ज दाखल करताना, 12 राज्यांचे मुख्यमंत्री असणार हजर
- राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी काँग्रेसच्या अटी – शर्ती आत्ताच सांगायची गरज नाही; महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथलांची गुगली!!