Tuesday, 13 May 2025
  • Download App
    महाराष्ट्र ‘ISIS’ मॉड्यूल प्रकरणात ’NIA’ कडून सहाव्या आरोपीला अटक! Sixth accused arrested by NIA in Maharashtra ISIS module case

    महाराष्ट्र ‘ISIS’ मॉड्यूल प्रकरणात ’NIA’ कडून सहाव्या आरोपीला अटक!

    NIA

    (संग्रहित)

    IED बनवण्यात सहभाग असल्याचा व दहशतवाद्यांना लपण्यासाठी व्यवस्था केल्याचा आरोप

    विशेष प्रतनिधी

    मुंबई : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) शनिवारी महाराष्ट्र ISIS मॉड्यूल प्रकरणात आणखी एक संशयित अकिफ अतिक नाचन याला अटक केली आहे. या प्रकरणातील ही सहावी अटक आहे. एनआयएने सांगितले की, ठाण्याच्या भिवंडी तहसीलच्या बोरीवली येथे छापे टाकल्यानंतर शनिवारी अकिफला अटक करण्यात आली. या छाप्यात इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि कागदपत्रे यांसारखे अनेक आक्षेपार्ह साहित्यही जप्त करण्यात आले आहे. Sixth accused arrested by NIA in Maharashtra ISIS module case

    NIA ने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, अकिफ इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस (आयईडी) बनवण्यात माहीर आहे आणि दहशतवादी घटना घडवण्यासाठी आयईडी बनवण्यात व त्याची चाचणी करण्यात त्याचा सहभाग असल्याचा संशय आहे. याशिवाय त्याच्यावर आणखी दोन दहशतवाद्यांसाठी लपण्याची व्यवस्था केल्याचा आरोप आहे.

    तपास एजन्सीच्या म्हणण्यानुसार, अकीफसह अन्य चार संशयित झुल्फिकार अली बडोदावाला, मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी आणि अब्दुल कादिर पठाण हे इतर काही संशयितांसह दहशतवादी संघटना ISIS च्या दहशतवादी-संबंधित कारवायांना प्रोत्साहन देण्यात सक्रियपणे सहभागी असल्याचे आढळून आले. या सर्वांना महाराष्ट्र एटीएसने नुकतीच अटक केली आहे.

    Sixth accused arrested by NIA in Maharashtra ISIS module case

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    IPL 2025 : आयपीएल २०२५चे नवीन वेळापत्रक जाहीर, १७ मे पासून सामना सुरू होणार

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थानात पुन्हा ड्रोन दिसले; होशियारपूरमध्ये 5-7 स्फोट, ब्लॅकआऊट

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!