विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: हिमाचल प्रदेशमधील सहा बंडखोर काँग्रेस आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या आमदारांनी अपात्र ठरवण्याच्या सभापतींच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. विधानसभेच्या अर्थसंकल्पावेळी उपस्थित नसल्याच्या कारणावरून सभापतींनी या आमदारांना अपात्र ठरवले. आमदारांनी सभापतींचा हा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले असून तो रद्द करण्याची मागणी होत आहे.
या सहा काँग्रेस आमदारांनी राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होट केले होते. त्यामुळे भाजपचे हर्ष महाजन विजयी झाले. यादरम्यान काँग्रेसचे उमेदवार अभिषेक मनु सिंघवी यांना पराभवाला सामोरे जावे लागले. हे आमदार भाजपाच्या समर्थनार्थ वक्तव्य करताना दिसले. या आमदारांच्या क्रॉस व्होटिंगनंतर राज्यातील सुखविंदर सिंह सखू सरकार अडचणीत आले. बंडखोर आमदारांवर कडक कारवाई करण्याची काँग्रेसमध्ये चर्चा होती.
हिमाचल प्रदेश विधानसभेत २८ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प मंजूर करताना गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपच्या काही आमदारांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पाठवण्यात आले आहे. विधानसभेचे अध्यक्ष कुलदीप सिंग पठानिया यांनी सांगितले की, मंगळवारी म्हणजेच ५ मार्च रोजी काही सदस्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पाठवण्यात आले आहे.
Six rebel Congress MLAs from Himachal Pradesh in the Supreme Court against the Speakers decision
महत्वाच्या बातम्या
- भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा दिला राजीनामा
- ‘शासन आपल्या दारी’ हा लोकाभिमुख उपक्रम; चार कोटी लोकांना मिळाला लाभ
- हरियाणा पोलिसांना यश, इनेलोचे नेते नफे सिंह राठी खूनप्रकरणी गोव्यातून 2 शूटर्सना अटक
- लालूंनी काल पाटण्यातून मोदींना दिली “संधी”; मोदींनी आज चेन्नईतून उडवली DMK – INDI परिवारवादाची “दांडी”!!
- सनातन धर्माचा अपमान; सुप्रीम कोर्टाची उदयनिधी स्टालिनला सणसणीत चपराक!!