वृत्तसंस्था
आणंद : गुजरातमधील आणंद जिल्ह्यात झालेल्या भीषण रस्ता अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार, ऑटो आणि बाईक यांच्यात झालेल्या धडकेने हा अपघात झाला, ज्यामध्ये दुचाकीवरील दोन जण आणि ऑटोवरील चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर कार चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी याबाबत हिट एंड रन केस दाखल केली आहे. Six people died in an accident that took place between a car, bike & auto pm
कार, ऑटो आणि दुचाकीची धडक
आनंद एएसपी अभिषेक गुप्ता यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले की, काँग्रेस आमदार केतन पढियार यांच्या जावयाला या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात आनंद जिल्ह्यातील सोजित्रा तालुक्यातील डाळी गावाजवळ घडला. तर आणंद येथे सायंकाळी 7.00 च्या सुमारास कार, दुचाकी आणि ऑटो रिक्षा यांच्यात झालेल्या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. ऑटोमधील 4 जण आणि दुचाकीवरील 2 जण जागीच ठार झाले. तर कार चालकावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, आमदार जावयाला अटक
ही कार काँग्रेस आमदार केतन पढियार यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. केतन पढियार हे काँग्रेसच्या आमदार पूनमभाई परमान यांचे जावई असल्याची माहिती मिळतेय. सध्या पोलिसांनी आमदार जावयाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून आमदार जावयाला अटक केली आहे. पोलिसांनी काँग्रेस आमदाराच्या जावयावर हिट अँड रनचा गुन्हा दाखल केला आहे.
Six people died in an accident that took place between a car, bike & auto rickshaw at around 7pm
महत्वाच्या बातम्या
- काश्मिरात पुन्हा टार्गेट किलिंग : बांदीपोरामध्ये दहशतवाद्यांनी बिहारच्या मोहम्मद अमरेजवर झाडल्या गोळ्या
- ट्रम्प यांच्या घरावर छाप्यांचा मोठा खुलासा, आण्विक कागदपत्रांच्या शोधात गेली होती FBI
- ADRचा अहवाल : महाराष्ट्रातील 20 पैकी 15 मंत्र्यांविरुद्ध गुन्हेगारी खटले; 11 मंत्री पदवी, पदव्युत्तर पदवीधारक
- ममता बॅनर्जींना आणखी एक धक्का : निकटवर्तीय अणुव्रत मंडल यांना अटक, 8 आयपीएस अधिकाऱ्यांना समन्स