वृत्तसंस्था
नवी दिल्ली : ब्लॅक फंगसवरील उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शनचे उत्पादन आणि आयात करण्याची परवानगी देशातील सहा कंपन्यांना सरकारने दिली आहे. Six companies allowed To Produced or procure The Injection Of black fungus.
कोरोनापाठोपाठ ब्लॅक फंगसचे रुग्ण देशात वाढू लागले आहेत. आतापर्यत 8 हजार 888 जणांना हा आजार झाला आहे. कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तीला विशेषतः मधुमेह असलेल्या व्यक्तीला आजाराचा धोका अधिक असल्याचे स्पष्ट होत आहे.
ब्लॅक फंगस अर्थात म्युकरोमायकोसिस हा एक प्रकारचा बुरशीजन्य आजार आहे. कोरोना असताना रुग्णाला स्टेरिओईड दिल्यामुळे हा आजार बळावत असून तो मधुमेह असणाऱ्या व्यक्तीला होतो आहे, असे स्पष्ट झाले आहे.
आता या आजारावर उपयोगी पडणारे Liposomal amphotericine B हे इंजेक्शन उत्पादन आणि आयात करण्याची परवानगी सहा कंपन्यांना दिली आहे.
परवानगी दिलेल्या कंपन्यांची नावे
- भारत सीरम अँड वैक्सीन लिमिटेड
- बीडीआर फार्मास्युटिकल्स लिमिटेड
- सन फार्मा लिमिटेड
- सिपला लिमिटेड
- लाइफ केयर इनोवेशन
- माईलॅन लॅब्स (आयात करणार)
Six companies allowed To Produced or procure The Injection Of black fungus.
महत्त्वाच्या बातम्या
- जगभरात कोरोना मृत्यूंची संख्या प्रत्यक्षात दुप्पट असल्याची WHO ची भीती; १८ नव्हे, ३० लाख रुग्णांच्या मृत्यूची शक्यता
- लडाखमध्ये 24 तासांत दुसऱ्यांदा भूकंप, रिश्टर स्केलवर 3.6 तीव्रतेची नोंद
- Nepal Mid-Term Polls : नेपाळच्या राष्ट्रपतींनी संसद भंग केली, मध्यावधी निवडणुकीसाठी नवीन तारीख जाहीर
- Corona Cases In India : २४ तासांत २.५७ लाख नवीन रुग्णांची नोंद, सक्रिय रुग्णसंख्या एक लाखाने घटली
- Air India Data Leak : 45 लाख प्रवाशांच्या क्रेडिट कार्डसह वैयक्तिक माहिती चोरीला, कंपनी म्हणते – पेमेंट डेटा सुरक्षित