वृत्तसंस्था
चेन्नई : भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट विश्वचषक सामन्यात अहमदाबाद मधल्या नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये सातत्याने जय श्रीरामचा घोष झाला. या घोषणांनी पाकिस्तानी खेळाडू डिवचले, असे खुद्द पाकिस्तानी खेळाडू नाही म्हणाले, पण भारतातल्याच लिबरल्सना त्या घोषणांचा चटका बसला. त्यामुळे त्यांनी जय श्रीराम घोषणांवरच आगपाखड केली. यात पत्रकार राजदीप सरदेसाईंचाही समावेश होता. sivaramkrishan responds to rajdeep why use shriram chants mock pak players post
आम्ही आमच्या जवळच्या पार्कमध्ये मॉर्निंग वॉकला गेलो की एकमेकांना रामराम करतो. पण काल पाकिस्तानी खेळाडूंना डिवचण्यासाठी जय श्रीराम घोषणा देण्याची गरज होती का? श्रीरामाची मर्यादा भक्तांनीच पाळली नाही, अशी टिप्पणी करणारे ट्विट राजदीप सरदेसाईंनी केली.
राजदीपच्या ट्विटला भारताचा फिरकी जादूगार एल. शिवराम कृष्णनने चपखल प्रत्युत्तर दिले. वयाच्या सोळाव्या वर्षी पाकिस्तानमध्ये मला माझ्या रंगावरून, धर्मावरून, देशाच्या संस्कृतीवरून पाकिस्तान मध्ये काय – काय ऐकायला लागले, ते फक्त माझे मलाच माहिती. कोणत्याही सभ्य समाजात असे कोणालाही ऐकवले जात नाही. त्यामुळे ज्याने हे काही अनुभवलेच नाही त्याने उगाच जय श्रीरामच्या घोषणांवर बोलू नये, असे ट्विट शिवराम कृष्णनने करून राजदीपला चपराक हाणली आहे.
sivaramkrishan responds to rajdeep why use shriram chants mock pak players post
महत्वाच्या बातम्या
- फ्रेंच कंपनीला भारतात राफेल निर्मितीची इच्छा; नागपूरजवळ मिहानला राफेल असेंब्ली लाइनवर झाली चर्चा
- मीरवाइज उमर फारूक बदलले; पॅलेस्टिनी हक्कांसह इस्रायली हक्कांच्या जपणुकीचीही भाषा बोलू लागले!!
- संघ शताब्दीच्या पार्श्वभूमीवर जम्मू – काश्मीरमध्ये संघकार्य विस्तारावर सरसंघचालकांचा भर!!
- ‘पाकिस्तान हमासच्या दहशतवाद्यांना विजय समर्पित करू शकला नाही’, भारताच्या विजयानंतर इस्रायलच्या राजदूताचा टोमणा!