• Download App
    Sitaram Yechury सीताराम येचुरी: डाव्या चळवळीसाठी मोजली किंमत

    Sitaram Yechury : सीताराम येचुरी: डाव्या चळवळीसाठी मोजली किंमत

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : प्रख्यात मार्क्सवादी नेते, डाव्या चळवळीतील अग्रणी आणि सीपीआय-एम पक्षाचे लागोपाठ तीन वेळा सरचिटणीस हे सर्वोच्च पद भूषविणारे सीताराम येचुरी यांचे आज निधन झाले. डाव्या विचारसरणीची ही मोठी हानी मानली जाते. अत्यंत निस्पृह आणि डाव्या चळवळीसाठी वाटेल ती किंमत मोजणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती.

    मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांची प्रकृती खालावल्यामुळे मंगळवार, दि. १० सप्टेंबर रोजी त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज (दि. १२ सप्टेंबर) अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. ताप, अशक्तपणा जाणवू लागल्यानंतर त्यांच्यावर अतीदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यानच ७२ वर्षीय येचुरी यांचे निधन झाले.

    २०१५ साली ज्येष्ठ नेते प्रकाश करात यांच्यानंतर सीताराम येचुरी यांची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या महासचिवपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर २०१८ आणि २०२२ साली त्यांना दोन वेळा या पदावर राहण्याची संधी मिळाली. डाव्या पक्षातील निर्णय प्रक्रियेत महासचिव हे सर्वोच्च पद मानले जाते.


    हायकोर्टाने 4 दहशतवाद्यांची फाशी जन्मठेपेत बदलली; पाटण्यात मोदींच्या सभेत बॉम्बस्फोट घडवला होता


    सीताराम येचुरी हे भारतातील प्रख्यात मार्क्सवादी नेते असून, त्यांची राजकीय जडण घडण डाव्या विचारांच्या चळवळीत झाली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष म्हणजेच CPI(M) चा एक सामान्य कार्यकर्ता ते महासचिव या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा राजकीय प्रवास आहे. डाव्या विचारसरणीशी असलेली एकनिष्ठता, त्या अनुषंगाने घेतलेल्या भूमिका आणि त्या भूमिकांसाठी वेळोवेळी राजकीय किंमत मोजण्याची तयारी.. या गुणांमुळे ते भारतीय डाव्या राजकारणातील एक महत्त्वाचा आवाज म्हणून समोर आले.

    सीताराम येचुरी यांचा जन्म १२ ऑगस्ट १९५२ रोजी चेन्नई येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण हैदराबाद येथे झाले आणि त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन कॉलेजमधून अर्थशास्त्रातील पदवी प्राप्त केली. पुढे, जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (JNU) त्यांनी अर्थशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण घेतले, जिथे त्यांच्या राजकीय कारकि‍र्दीला सुरुवात झाली. १९७० च्या दशकात, विद्यार्थीदशेतच येचुरी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) च्या ‘स्टूडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया’ (SFI) या विद्यार्थी संघटनेत सामील झाले. कालांतराने ते SFI चे प्रमुख नेते बनले आणि या संघटनेचे अध्यक्षही झाले. १९८४ साली येचुरी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीचे सदस्य बनले. १९९२ साली त्यांची पक्षाच्या पॉलिटब्युरोमध्ये नियुक्ती झाली. पक्षाचे मुखपत्र असलेल्या “पीपल्स डेमोक्रसी”चे अनेक वर्ष संपादकपदही त्यांनी भूषविले.

    Sitaram Yechury : The Gem of the left movement

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे