विशेष प्रतिनिधी
मुबंई : स्वरा भास्कर ही आपल्या बोल्ड वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असते. पण सध्या ती चर्चेत आहे ती एका वेगळ्याच कारणासाठी. स्वरा भास्करने एका मुलीला अडॉप्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. आता ती सिंगल मदर म्हणून प्राऊडली या मुलीला वाढवणार आहे.
Single Mother: After Raveena Tandon, Sushmita Sen Now Actress Swara Bhaskar Will Adopt A Girl
फ्री प्रेस जर्नलला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने आपले याबद्दलचे मत व्यक्त केले आहे. ती म्हणते, भारतात आपण जेव्हा एखाद्या लहान बाळाला वाढवतो, तेव्हा त्या बाळाचे आई आणि वडील दोघेच त्याचे संगोपन करत नसतात. तर आपल्याला फॅमिली नावाची एक संपूर्ण सपोर्ट सिस्टिम मिळते.ज्यामुळे आपण बायका आपले करिअर करू शकतो.
“पद्म पुरस्कार येत आहे” , विक्रम गोखलेंच्या वक्तव्यावर स्वरा भास्करची प्रतिक्रिया
पुढे ती म्हणते, ही सपोर्ट सिस्टीम एक चांगला भाग आहेच तर बरेच लोक असेही असतात जे अतिशय वेगळ्या पद्धतीने बोलतात. बरेच लोक असं म्हणताना दिसतात की, लग्नाआधी बाळाला दत्तक घेतले तर आता तुझे लग्न कसे होणार? कोण तुला स्वीकारणार? अशाप्रकारच्या विचारसरणीचे लोक देखील आपल्या समाजामध्ये आहेत. त्यामुळे एक सिंगल मदर बनणे हे अतिशय कठीण आहे. पण मी खूप नशीबवान आहे की, मला माझ्या फॅमिली आणि फ्रेंड्स सगळ्यांचा सपोर्ट मिळाला आहे.
Single Mother: After Raveena Tandon, Sushmita Sen Now Actress Swara Bhaskar Will Adopt A Girl