• Download App
    सिंगापूर सरकारने केजरीवालांना फटकारले, सिंगापूर स्ट्रेन नाही हा तर भारतातूनच आलेला व्हायरस Singapore government slams Kejriwal, Singapore is not a strain, it is a virus from India

    सिंगापूर सरकारने केजरीवालांना फटकारले, सिंगापूर स्ट्रेन नाही हा तर भारतातूनच आलेला व्हायरस

    कोरोनाचा नवा स्ट्रेन सिंगापूरहून आला असून लहान मुलांसाठी घातक असल्याचा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. मात्र, यावरून सिंगापूर सरकारने केजरीवाल यांना फटकारले आहे. सिंगापूरने म्हटलेआहे की गेल्या काही आठवड्यांपासून सापडत असलेला बी १.६१७.२ हा व्हेरिएंट मुळ भारतीय आहे. Singapore government slams Kejriwal, Singapore is not a strain, it is a virus from India


    प्रतिनिधी

    सिंगापूर : कोरोनाचा नवा स्ट्रेन सिंगापूरहून आला असून लहान मुलांसाठी घातक असल्याचा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. मात्र, यावरून सिंगापूर सरकारने केजरीवाल यांना फटकारले आहे. सिंगापूरने म्हटलेआहे की गेल्या काही आठवड्यांपासून सापडत असलेला बी १.६१७.२ हा व्हेरिएंट मुळ भारतीय आहे.

    केजरीवाल यांनी नुकतीच केंद्राला विनंती केली होती की सिंगापूरची विमानसेवा तातडीने स्थगित करावी. कारण या ठिकाणाहून कोरोनाचा नवा स्ट्रेन भारतात येण्याची भीती आहे. हा नवा स्ट्रेन मुलांसाठी घातक ठरू शकतो. हाच नवा स्ट्रेन भारतामध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्यास कारणीभूत होऊ शकतो. त्याचबरोबर केंद्राने लवकरात लवकर मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीसाठी प्रयत्न करावेत.



    याबाबत सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की केजरीवाल यांचे वक्तव्य बिनबुडाचे आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. सिंगापूर व्हेरिएंट नावाचा कोणाताही स्ट्रेन नाही. सिंगापूरमध्ये गेल्या काही आठवड्यापासून सापडत असलेला स्ट्रेन हा मुळात भारतातून आला आहे.

    Singapore government slams Kejriwal, Singapore is not a strain, it is a virus from India

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Understand Geo politics : भारताने न मागताच ट्रम्प यांची काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी; भारत – पाकिस्तान यांना बरोबरीचे ठरवून करणार व्यापारवृद्धी!!

    Army officers Munir : पाकिस्तानात मुनीर यांच्या निर्णयांवर सैन्याधिकाऱ्यांकडून प्रश्न; आपल्या बचावात पोस्टर्स लावत आहेत लष्करप्रमुख

    Pakistan drone attack : युद्धबंदीनंतर बाडमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; जैसलमेरमध्ये एकामागून एक 6 स्फोटांचे आवाज