Operation sindoor मध्ये भारतीय सैन्याच्या पराक्रमाने पाकिस्तानचा लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर याची चड्डी फाडली, तरी त्याचा कोट अंगावर शिल्लक राहिल्याने त्याने लगेच आपल्या कोटावर फील्ड मार्शलीचा “मोठ्ठा स्टार” लावून घेतला. पण हा “स्टार” लावून दोन दिवस झाले नाहीत, तोच सिंध प्रांतातल्या आगीत फील्ड मार्शलीचा स्टार जळून गेला!!
पाकिस्तानातली अस्थिरता पाहून आणि आपली नोकरी धोक्यात आल्याचे लक्षात घेऊन जनरल असीम मुनीर यानेच पाकिस्तान ओव्हरसीज कॉन्फरन्स मध्ये हिंदुद्वेषी आणि भारत द्वेषी भाषण करून पहलगाम हल्ल्याला चिथावणी दिली. त्यानंतर भारताचे पाकिस्तान वरचे हल्ले उडवून घेतले. भारताने पाकिस्तानात खोलवर घुसून पाकिस्तानचे 20 % हवाई दल उडवले. सगळे पाकिस्तानच भारतीय हल्ल्यांच्या टप्प्यात आणले. सिंधू जल करार स्थगित करून पाकिस्तानच्या तोंडचे पाणी पळवले, तरी जिहादी जनरल असीम मुनीर याने स्वतःची पाठ थोपटून घेत स्वतःला “फील्ड मार्शल” जाहीर करवून घेतले. त्यासाठी असीम मुनीर याने अमेरिकेच्या ट्रम्प खानदाशी क्रिप्टो करन्सी करार केला. पाकिस्तानातली मौल्यवान जमीन ट्रम्प खानदानाला कवडीमोल भावात विकली.
Operation sindoor ची कारवाई भारताने दहशतवादाविरुद्ध मर्यादित ठेवली. चारच दिवसांमध्ये शस्त्रसंधी केली हाच “आपला विजय” मानून पाकिस्तानी जनता आपल्या पाठीशी उभी असल्याचे चित्र निर्माण केले. पाकिस्तानी जनतेच्या एकजुटीचा प्रापोगांडा केला. पाकिस्तान व्याप्त काश्मीर, बलुचिस्तान, सिंध, खैबर प्रांत आपापले सगळे महत्त्वाचे मुद्दे विसरलेत. पाकिस्तानी जनता पाकिस्तानी लष्कराच्या पाठीशी ठाम उभी राहिली आहे. पाकिस्तानी लष्कराचा पराक्रम नावाजते आहे. पाकिस्तानच्या अखंडतेला आणि सार्वभौमत्वाला आता कुणी धक्का लावू शकत नाही, असे आभासी चित्र जनरल असीम मुनीर आणि त्याच्या पंजाबी बगलबच्चांनी उभे केले.
… आणि खरं म्हणजे इथेच असीम मुनीर आणि त्याचे पंजाबी बगलबच्चे फसले. कारण पाकिस्तानच्या तथाकथित विजयाने बलुचिस्तान मधली स्वातंत्र्याची आग तर विझली नाहीच, उलट सिंध मधली स्वातंत्र्याची आग आणि पंजाबी गुलामगिरी विरुद्धचे आवाज जास्त भडकले. सिंध प्रांतात वेगवेगळ्या शहरांमध्ये पंजाबी वर्चस्वाविरुद्धचे आंदोलन तीव्र झाले. सिंध प्रांताच्या गृहमंत्र्याचे घर जाळण्यापर्यंत आंदोलन पेटले. सिंध प्रांताच्या हक्काचे पाणी पंजाबी पळवत आहेत, याविरुद्ध ही आग भडकली.
– सिंध बलुचिस्तानचे पाणी पळवायचा डाव
सन 2023 मध्ये असीम मुनीर आणि शहाबाज शरीफ या जोडगोळीने Green Pakistan या नावाखाली सिंध आणि बलुचिस्तान या दोन प्रांतांमध्ये वाहणारे वेगवेगळ्या नद्यांचे पाणी कालवे बांधून पंजाब मध्ये वळविण्याची मोहीम आखली. या कालव्यांचे प्रत्यक्ष काम सुरू केले. त्यातले काही काम पूर्ण झाल्यावर तर सिंध आणि पूर्व बलुचिस्तान या भागांमध्ये पाणी पंजाब कडे वळविले गेले. उत्तर सिंध मधले 6 जिल्हे आणि पूर्व बलुचिस्तान मधले 5 जिल्हे पाणीटंचाईने त्रस्त असताना पाकिस्तानी पंजाबी लष्करी व्यवस्थेने दोन्ही प्रांतांमध्ये पाणी पळविले. म्हणूनच त्या विरुद्ध सिंध प्रांतात मोठी आग भडकली. शहाबाज शरीफ सरकारला पाठिंबा देणाऱ्या भुट्टो खानदानाच्या वर्चस्वाला आग लागली. सिंध प्रांताचा भुट्टो समर्थक गृहमंत्री झियाउल हसन लांजर याचे घर आंदोलकांनी जाळले.
असीम मुनीर हा फील्ड मार्शल झाला म्हणजे त्याने लै मोठा ग्रंथ बिंथ पाडून पाकिस्तानच्या लष्करी राजवटीत लै म्हणजे लैच मोठा इतिहास घडविला वगैरे बाता दोन दिवसांत आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. असीम मुनीरची फील्ड मार्शली सिंधच्या आगीत जळून गेली. पाकिस्तानी लष्कराच्या पाठीशी पाकिस्तानी जनता ठामपणे उभी असल्याचा समज सिंध प्रांताने खोटा ठरविला.
Sindh burning against Punjabi dominance, tight slap on Asim Munir’s face
महत्वाच्या बातम्या
- Corona virus : कोरोना व्हायरसने पुन्हा वाढवली चिंता, आरोग्य विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून
- पहलगाम हल्ल्याची, नंतर भारताचा मार खाल्ल्याची जनरल असीम मुनीरला बक्षीसी; फील्ड मार्शल पदी बढती!!
- Piyush Goyal : भारत-अमेरिका व्यापार करारावरील चर्चा यशस्वी – केंद्रीयमंत्री पियुष गोयल
- Waqf सुधारणा कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले; सबळ पुरावा नसताना हस्तक्षेपाला नकार!!