वृत्तसंस्था
सिध्दार्थनगर : उत्तर प्रदेशातील पूर्वांचलमध्ये आज ऐतिहासिक दिवस ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकाच वेळी ९ मेडिकल कॉलेजचे उद्घाटन झाले. यामध्ये २५०० बेड्स उपलब्ध असून सुमारे ५००० जणांना या मेडिकल कॉलेजच्या निमित्ताने रोजगार उपलब्ध होणार आहे. पूर्वांचलची प्रतिमा गुंड – माफियांच्या राज्य चालण्याची होती. ते आता उत्तर भारतातले मेडिकल हब बनेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. Simultaneous inauguration of 9 medical colleges in Purvanchal, Uttar Pradesh; 2500 beds, 5000 staff
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सिध्दार्थनगरमध्ये आहेत. त्यांनी या ९ मेडिकल कॉलेजचे उद्घाटन केले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान म्हणाले, की आतापर्यंत असे कधीही झाले नाही, की एकाच दिवशी एकाच वेळी ९ मेडिकल कॉलेजचे उद्घाटन झाले आहे. आतापर्यंतच्या सरकारांची कामगिरी हीच होती, की आपले आणि आपल्या परिवाराचे लॉकर्स भरायचे. पण आमच्या सरकारचे प्राधान्य गरीबाचे जगणे सुसह्य करायचे आहे. त्यांचा पैसा वाचवून त्यांना सुविधा द्यायच्या आहेत.
उत्तर प्रदेशात पूर्वांचलाची प्रतिमा आधीच्या सरकारांच्या काळात काय होती… इथे गुंड – माफियांचे राज्य चालते. त्यांचा एवढा दरारा होता की त्यांनी स्वतःची न्यायव्यवस्था उभी केली होती. योगींनी त्यांचा दरारा संपविला. पूर्वांचलमध्ये मेडिकल कॉलेज उभारून येथे वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिली आहे. योगींनी ते मुख्यमंत्री नसताना संसदेत देखील पूर्वांचलमधील वैद्यकीय सुविधांचे मुद्दे उपस्थित केले आहेत, याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवर्जून लक्ष वेधले.
Simultaneous inauguration of 9 medical colleges in Purvanchal, Uttar Pradesh; 2500 beds, 5000 staff
महत्त्वाच्या बातम्या
- नाशिकच्या कांदा व्यापाऱ्यांवर प्राप्तिकरची धाड, 26 कोटींची रोख आणि 100 कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड; नोटा मोजताना अधिकारीही झाले घामाघूम
- Aryan Khan case : संजय राऊत म्हणाले – साक्षीदाराचा दावा धक्कादायक; नवाब मलिक म्हणाले- सत्याचाच विजय होईल!
- Aryan Khan Drug Case : फरार गोसावीच्या साथीदाराचा धक्कादायक खुलासा! एनसीबीने धमकावून घेतल्या कोऱ्या पंचनाम्यावर सह्या, 18 कोटींच्या डीलपैकी 8 कोटी समीर वानखेडेंना?
- राहुल आणि प्रियांका गांधी यांचे निकटवर्तीय अल्लू मियाँला लखनौमध्ये अटक, फसवणूक आणि खंडणीचे प्रकरण