• Download App
    पर्यटकांच्या तुफान गर्दीने सिमला, मनाली फुलले, कोरोनाचा मागमूसही नाही|Simla, Manali blossomed with the storm of tourists, there is no trace of Corona

    पर्यटकांच्या तुफान गर्दीने सिमला, मनाली फुलले, कोरोनाचा मागमूसही नाही

    विशेष प्रतिनिधी

    मनाली : मनाली, सिमला येथे सध्या पर्यटकांची तुडूंब गर्दी पाहावयास मिळत आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंडसारख्या पर्वतीय राज्यात पर्यटकांचा ओघ सुरू झाला आहे.Simla, Manali blossomed with the storm of tourists, there is no trace of Corona

    उत्तर भारतात सध्या उष्णतेची लाट असताना त्यापासून बचाव करण्यासाठी अनेक नागरिक सिमला, कुफ्री, नारकंडा, डलहौसी, धर्मशाला, मनाली, लाहोल, डेहराडूनला जात आहेत.



    मनालीतील नागरिकांच्या गर्दीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मनाली आणि सिमला येथे गेल्या आठवड्यात सर्व हॉटेल फुल्ल झाले होते. हॉटेलमध्ये जागा नसल्याने पंजाब, उत्तर प्रदेश, हरियानातून आलेल्या पर्यटकांना रस्त्यावरच राहावे लागले आहे.

    जूनमध्ये निर्बंध शिथिल केल्यानंतर आतापर्यंत दीड महिन्यात सहा ते सात लाख पर्यटकांनी मनाली, सिमल्याला भेट दिली आहे. उत्तर भारतात सध्या उष्णता असल्याने पर्यटक हिमालयीन राज्यात येत आहेत.

    पोलिसांकडून पर्यटकांना नियम पाळण्याच्या सूचना केल्या जात आहेत. १० हजारापेक्षा अधिक वाहने सिमल्यात गेल्या आठवड्यात दाखल झाली. हॉटेलमध्ये जागा नसून सिमला आणि किन्नोरच्या दुर्गम भागातही पर्यटक गर्दी करत आहेत.

    कोरोनाच्या काळात हिमाचल प्रदेशमध्ये प्रवेश करताना कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल आणि ई-पास असणे बंधनकारक होते. परंतु आता हा निर्णय मागे घेतल्याने गर्दी वाढली आहे. राज्याची अर्थव्यवस्था आणि रोजगार पर्यटनावरच अवलंबून असल्याने सरकारने शिथिलता दिली आहे.

    Simla, Manali blossomed with the storm of tourists, there is no trace of Corona

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य