विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Simi Rosebell कास्टिंग काऊचचा आरोप झाल्यानंतर केरळ काँग्रेसमध्ये सध्या घमासान सुरू आहे. पण त्याचवेळी केरळ काँग्रेसचा उफराटा न्याय देखील समोर आला. पक्षाच्या नेत्या सिमी रोझबेल जॉन यांनी कास्टिंग काऊचचा आरोप केला. त्यानंतर संबंधित आरोपींची छानशी करून दोषींना धरण्याऐवजी सिमी रोजाबेल जॉन यांची काही तासांतच पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. काँग्रेस पक्षात नेत्यांना “खूष” करणाऱ्या महिलांनाच पुढे जाण्याची संधी मिळत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता. Kerala Simi Rosebell John was expelled after she accused her party
मल्याळम चित्रपटसृष्टीत लैंगिक छळाच्या आरोपांनी रान उठले आहे. त्याचे वारे आता राजकारणातही वाहू लागले आहे. जॉन यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीनंतर राजकारणातील कास्टिंग काऊचचा मुद्दा समोर आला. त्यावर चौकशी आणि तपास करून संबंधित दोषी नेत्यांवर कायदेशीर कारवाई करण्याऐवजी केरळ काँग्रेस प्रदेश कमिटीने रविवारी रात्रीत पत्रक प्रसिद्ध करून जॉन यांना काँग्रेस मधून काढून टाकले.
पत्रकात म्हटले आहे की, जॉन यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. त्यांनी पक्षातील महिला नेत्यांचा मीडियासमोर अपमान केला. रोझबेल यांचे आरोप पक्षातील लाखो महिला नेत्या आणि कार्यकर्त्यांचा मानसिक छळ करणे आणि त्यांना बदनाम करण्याच्या उद्देशाने केलेले आहेत.
दरम्यान, पक्षातून बडतर्फ केल्यानंतर रोझबेल यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, आत्मसन्मान असलेली महिला अशा पक्षात काम करू शकत नाही. माझ्यावर केलेल्या आरोपांबाबत त्यांच्याकडे पुरावे असतील तर समोर आणावेत.
काय आहे प्रकरण?
सिमी रोझबेल जॉन Simi Rosebell यांनी शनिवारी पक्षातील नेत्यांवर कास्टिंग काऊचचे आरोप केले होते. चित्रपटसृष्टीप्रमाणेच राजकारणातही कास्टिंग काऊच होत असल्याचे त्यांनी म्हटले होते. जॉन यांच्या या आरोपांनंतर केरळ महिला काँग्रेसने त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली.
जॉन यांनी थेट विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतिशन यांच्यावर निशाणा साधला होता. मी त्यांच्या गुड बुकमध्ये जाऊ शकले नाही, कारण मी त्यांना “खूश” करू शकले नाही, असा गंभीर आरोप जॉन यांनी केला. केरळ काँग्रेसमधील किती महिलांना समस्यांना तोंड द्यावे लागले, असा सवालही जॉन यांनी उपस्थित केला आहे. ज्यांनी आदेशाचे पालन केले नाही त्यांना चांगली वागणूक मिळत नाही तर इतरांना पक्ष नेतृत्वाकडून सन्मान मिळतो, असा दावा जॉन यांनी केला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि इतर नेत्यांचा पाठिंबा असताना सतिशन यांनी आपला संधी नाकारली. मी पक्षासाठी जेवढे काम केले त्याचीशी सतीशन यांनी केलेल्या कामासोबत तुलनाही होऊ शकत नाही, असे जॉन यांनी म्हटले आहे. त्यांनी इतर काही महिलांना दिलेल्या पदांवर आक्षेप घेत सतिशन यांच्यावर आरोप केले. Simi Rosebell
Kerala Simi Rosebell John was expelled after she accused her party
महत्वाच्या बातम्या
- Tejashwi Yadav : सॅम पित्रोदा यांचा आत्मा तेजस्वी यादवमध्ये आहे का? – भाजपचा टोला!
- Haryana assembly elections : हरियाणा विधानसभा निवडणुकीची नवी तारीख जाहीर!
- Giriraj Singh attack : बेगुसराय येथे केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्यावर हल्ला
- Ladki Bahin Yojna In Nagpur : नागपुरात लाडक्या बहिणींच्या कार्यक्रमात कृतज्ञता आणि उत्साहाची अपूर्व जोड!!