लोकपाल खासदार आणि मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर लक्ष ठेवतो
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आता भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याप्रकरणी टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांच्याविरोधात लोकपालसमोर तक्रार दाखल केली आहे. त्यांनी स्वतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ही माहिती दिली. यामुळे आता महुआ मोईत्राच्या अडचणी वाढण्याची चिन्हं दिसत आहे. Signs of increase in mahua moitra problems After the Lok Sabha Speaker now Nishikant Dubey has filed a complaint with the Lokpal
निशिकांत दुबे यांनी लोकपालकडे तक्रार दाखल करण्याबाबत माहिती देताना X वर पोस्ट केले, “मी सीबीआय-सीबीआय ऐकून थकलो आहे. आज मी लोकपालकडे तक्रार दाखल केली. लोकपाल खासदार आणि मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर लक्ष ठेवतो, सीबीआयच त्याचं माध्यम आहे.”
तत्पूर्वी शनिवारी महुआ मोईत्रा यांच्यावर मोठा आरोप करत निशिकांत दुबे यांनी पोस्ट केली होती, काही पैशांसाठी एका खासदाराने देशाची सुरक्षा गहान ठेवली. दुबईतून संसदेचे आयडी उघडले गेले. त्यावेळी कथित खासदार भारतातच होत्या. या एनआयसीवर संपूर्ण भारत सरकार आहे. पंतप्रधान, अर्थ विभाग, केंद्रीय यंत्रणा. आताही तृणमूल काँग्रेस आणि विरोधीकांना राजकारण करायचे आहे, निर्णय जनतेचा, एआयसीने ही माहिती तपास यंत्रणेला दिली.
Signs of increase in mahua moitra problems After the Lok Sabha Speaker now Nishikant Dubey has filed a complaint with the Lokpal
महत्वाच्या बातम्या
- झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांची ओडिशाच्या राज्यपाल पदावर नियुक्ती
- मोदींच्या हस्ते महाराष्ट्रातील ५११ ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन, प्रत्येक केंद्रात १०० तरुणांना मिळणार प्रशिक्षण
- पवारांचा पॅलेस्टिनींना पाठिंबा; पवार आता सुप्रियांनाच हमासच्या बाजूने लढायला पाठवतील; आसामच्या मुख्यमंत्र्यांचा टोला!!
- WATCH : कर्नाटकात काँग्रेस मंत्र्यांच्या उपस्थितीत हवेत उडवल्या नोटा; भाजपची टीका- जनतेच्या लुटलेल्या पैशांनी