वृत्तसंस्था
नवी दिल्ली : ड्रग्ज, दहशतवाद फंडिंग क्रिप्टो करन्सी आणि तरुणाईला मोहात पाडणार्या विशिष्ट जाहिरातींपासून वाचविण्यासाठी केंद्र सरकारने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. या संदर्भातली एक बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. रिझर्व बँकेचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.Significant steps taken by the central government to protect youth from the dangers of cryptocurrency
भारतात वाढलेला क्रिप्टो करन्सीचा वापर, त्यातही तरुणीला तरुणाईला भुलविण्यासाठी वाढीव दावे करणाऱ्या जाहिराती याबाबत या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात येऊन त्याला आळा घालण्यास संबंधित महत्वपूर्ण उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपाययोजना लवकरच जाहीर करण्यात येतील, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे.
क्रिप्टो करन्सीचा वापर ड्रग्ज व्यापारात, दहशतवाद फंडिंगमध्ये वाढल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली आहे. तरुणाई या पद्धतीने जर ड्रग्जच्या जाळ्यात ओढली जात असेल तर ती अधिक चिंतेची बाब आहे. बरोबर क्रिप्टो करन्सी सारख्या देशाची सीमा नसलेल्या अनियंत्रित करन्सीला आळा घालावा लागेल. त्यातून निर्माण होणाऱ्या बेकायदेशीर घटकांना प्रतिबंध करणे ही आता तातडीची आवश्यकता झाली आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थांची मदत घेऊन भारतामध्ये विशिष्ट कठोर उपाययोजना कराव्या लागतील, असे आग्रही मत या बैठकीत व्यक्त करण्यात आले आहे. या उपाय योजनांवर या बैठकीत अनुकूल मत व्यक्त करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये ड्रग्ज संदर्भात केंद्रीय तपास संस्थांनी जो तपास केला त्यातून काही अंडरकरंट लक्षात आले आहेत. यातला ड्रग्ज, विविध गुन्हे, दहशतवाद फंडिंग आणि क्रिप्टो करन्सी यांच्यातील विशिष्ट संबंध हा मुद्दा सर्वाधिक महत्त्वाचा आहे. त्याला प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने आजची बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
या बैठकीतून काही ठोस निर्णय अपेक्षित आहेत घेण्यात आले आहेत. ते लवकरच जाहीर करण्यात येतील असे सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
Significant steps taken by the central government to protect youth from the dangers of cryptocurrency
महत्त्वाच्या बातम्या
- मला गुजरातीपेक्षा हिंदी भाषा जास्त आवडते, आपल्याला आपली अधिकृत भाषा मजबूत करण्याची गरज आहे – अमित शहा
- MALIK VS WANKHEDE : …त्या कागदपत्रात नंतर अक्षरे घुसडल्याचे साध्या डोळ्यांनाही दिसतं ; नवाब मलिकांनी सोशल केलेल्या वानखेडेंच्या जन्मदाखल्यावर हायकोर्टाची फटकार
- अमरावती शहरात कलम १४४ लागू , जिल्हाधिकारी पवणीत कौर यांनी दिले जमावबंदीचे आदेश
- Delhi Lockdown:असह्य दिल्ली-परेशान दिल्लीकर! दिल्लीमध्ये प्रदूषणाचा लॉकडाऊन ! नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन…