• Download App
    सिध्दू म्हणतात, पंजाबमध्ये आता गद्दारांची खैर नाही, कॉँग्रेसच्या नाकावर टिच्चून घेतली मुख्यमंत्री मान यांची भेट Sidhu says traitors are no longer live in Punjab, meet Chief Minister Mann

    सिध्दू म्हणतात, पंजाबमध्ये आता गद्दारांची खैर नाही, कॉँग्रेसच्या नाकावर टिच्चून घेतली मुख्यमंत्री मान यांची भेट

    पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांनी आता थेट आव्हान दिले आहे. शिस्तभंगाच्या कारवाईची चर्चा सुरू असताना कॉँग्रेसच्या नाकावर टिच्चून त्यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांची भेट घेतली. मला मुख्यमंत्र्यांकडून खूपच अपेक्षा आहेत. पंजाबमध्ये आता गद्दारांची खैर नाही. मी सांगितल्याप्रमाणे केल्यास मी मान यांचा जयजयकार करीन, असेही म्हटले. Sidhu says traitors are no longer live in Punjab, meet Chief Minister Mann


    विशेष प्रतिनिधी

    चंडीगड : पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांनी आता थेट आव्हान दिले आहे. शिस्तभंगाच्या कारवाईची चर्चा सुरू असताना कॉँग्रेसच्या नाकावर टिच्चून त्यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांची भेट घेतली. मला मुख्यमंत्र्यांकडून खूपच अपेक्षा आहेत. पंजाबमध्ये आता गद्दारांची खैर नाही. मी सांगितल्याप्रमाणे केल्यास मी मान यांचा जयजयकार करीन, असेही म्हटले.

    सिद्धू यांचे पंजाब काँग्रेसमधील कोणाशीही पटत नाही, हे वारंवार दिसून आले आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रभारी हरीश चौधरी यांनी सिद्धूंची तक्रार केली होती. नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंह राज वडिंग यांनीही सिद्धूंची तक्रार केलेली आहे. काँग्रेसच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष ए. के. अँटोनी आजारी असल्यामुळे ही बैठक होऊ शकली नाही. त्या बैठकीत सिद्धूंवरील कारवाईचा फैसला होणार होता, असे समजते.



    सिद्धू हे विरोधी पक्षांच्या नेत्यांची प्रशंसा करून काँग्रेसला अडचणीत आणतात, याबाबत पक्षश्रेष्ठी नाराज आहेत. सिद्धूंनी आधी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या बाजूने ट्वीट केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांना भेटण्याचे ठरविले. यासाठी सिद्धू पक्षश्रेष्ठींना कोणत्याही प्रकारे विश्वासात घेत नाहीत.

    मात्र, या सगळ्यांची पर्वा न करता त्यांनी राज्य सचिवालयात सुमारे ५० मिनिटे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. १७० सेवा लोकांच्या दारापर्यंत न्याव्यात, असा सल्ला दिला. राजकीय इच्छाशक्ती असलेला मुख्यमंत्रीच जनतेच्या आकांक्षांना पंख देऊ शकतो, असे ट्वीट सिद्धूंनी केले आहे.

    Sidhu says traitors are no longer live in Punjab, meet Chief Minister Mann

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य