• Download App
    ​​​​​​​ बंगळुरात रेव्ह पार्टीतून सिद्धांत कपूर पोलीसांच्या ताब्यात; चाचणी ड्रग्ज पॉझिटीव्ह, पण शक्ती कपूर मुलाच्या बचावात पुढे!!Siddhant Kapoor from Rev Party in Bangalore in police custody

    शक्ती कपूर :​​​​​​​ बंगळुरात रेव्ह पार्टीतून सिद्धांत कपूर पोलीसांच्या ताब्यात; चाचणी ड्रग्ज पॉझिटीव्ह, पण शक्ती कपूर मुलाच्या बचावात पुढे!!

    वृत्तसंस्था

    बंगळुरू : ज्येष्ठ अभिनेते शक्ती कपूरचा मुलगा सिद्धांत याला बंगळुरू पोलिसांनी अटक केली आहे. सिद्धांतवर ड्रग्ज घेतल्याचा आरोप आहे. बंगळुरूमधील एमजी रोडवरील हॉटेलमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर छापा घालून पोलिसांनी सिद्धांतसह आणखी 6 जणांना ताब्यात घेतले आहे. हे सर्व आरोपी ड्रग्ज टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळले आहेत. सिद्धांत सध्या उलसूर पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र असे घडणे शक्य नाही, अशी प्रतिक्रिया शक्ती कपूर यांनी व्यक्त केली आहे. Siddhant Kapoor from Rev Party in Bangalore in police custody

    गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी एमजी रोडवरील एका हॉटेलवर छापा घातला. तेथे पार्टी आयोजित करण्यात आली होती. पोलिसांनी ड्रग्स सेवनाचा संशय असलेल्या लोकांचे नमुने तपासासाठी पाठवले. त्यात तपासणीत पॉझिटिव्ह आढळलेल्या 6 जणांमध्ये सिद्धांत कपूरच्या नमुन्याचाही समावेश होता.



    – सुशांत प्रकरणात श्रद्धाची चौकशी

    सुशांत सिंग राजपूत ड्रग्ज प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या चौकशी यादीत श्रद्धा कपूरचाही समावेश होता. मात्र, तिच्याविरुद्ध ठोस पुरावे सिद्ध होऊ शकले नाहीत. श्रध्दा कपूर, सारा अली खान आणि दीपिका पदुकोण यांची नावे सप्टेंबर 2020 मध्ये व्हॉट्सअॅप चॅटमध्ये दिसल्यावर त्यांची चौकशी करण्यात आली होती.

    – सिद्धांत कपूरची कारकीर्द

    सिद्धांत कपूर हा बॉलिवूड अभिनेता शक्ती कपूरचा मुलगा आहे. 1997 मध्ये आलेल्या जुडवा या चित्रपटातून त्यांनी करिअरला सुरुवात केली. सिद्धांतने अग्ली, जज्बा, हसीना पारकर, पलटन, हॅलो चार्ली आणि चेहरे यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भौकाल या मालिकेतही सिद्धांत दिसला होता.

    – शक्ती कपूर प्रतिक्रिया

    ड्रग्ज प्रकरणात सिद्धांत कपूरचे नाव समोर आल्यानंतर शक्ती कपूर यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. सोमवारी सिद्धांतला पोलिस कोठडीत घेतल्याची बातमी आल्यानंतर एका वेबसाइटशी बोलताना शक्ती कपूर म्हणाले की, “मी फक्त एक गोष्ट सांगू शकतो, हे शक्य नाही”.

    Siddhant Kapoor from Rev Party in Bangalore in police custody

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची