• Download App
    Siddaramaiahs 'महाकुंभातही ५०-६० लोकांचा मृत्यू’;

    Siddaramaiahs : ‘महाकुंभातही ५०-६० लोकांचा मृत्यू’; बंगळुरूमधील चेंगराचेंगरीवर सिद्धरामय्या वादग्रस्त विधान

    Siddaramaiahs

    बंगळुरूमधील या हृदयद्रावक दुर्घटनेवर आता विविध प्रतिक्रिया येत आहेत.


    विशेष प्रतिनिधी

    बंगळुरू – Siddaramaiahs  आयपीएल २०२५ मधील विजय साजरा करण्यासाठी बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिथे प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली आणि अनेकांना आपले प्राण गमवावे लागले.Siddaramaiahs

    प्राप्त माहितीनुसार या ठिकाणच्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ३३ जखमींवर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामुळे लोकांना धक्का बसला आहे.



    दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे या दुर्घटनेवरील एक विधान समोर आले आहे, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. या दुर्घनटनेवर प्रतिक्रिया देताना सिद्धरामय्या यांनी महाकुंभाचा उल्लेख केला, जिथे चेंगराचेंगरीत अनेकांना आपले जीव गमवावा लागला होता.

    बंगळुरूमधील या हृदयद्रावक दुर्घटनेवर आता विविध प्रतिक्रिया येत आहेत. कर्नाटक सरकारने जबाबदारी झटकून क्रिकेट असोसिएशनला दोषी ठरवले आहे. भाजपच्या प्रश्नांना उत्तर देताना राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाकुंभाचे उदाहरण दिले.

    पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर कर्नाटकचे मुख्यमंत्री संतापले आणि रागाने म्हणाले, ‘अशा घटना अनेक ठिकाणी घडल्या, अगदी कुंभमेळ्यातही ५०-६० लोकांचा मृत्यू झाला. त्यावेळी मी टीका केली नाही. मी किंवा माझ्या सरकारने कोणतीही टिप्पणी केली नाही. पक्षाने काय म्हटले यावर मला काहीही बोलायचे नाही.’

    Siddaramaiahs controversial statement on stampede in Bengaluru

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहा जीमेलवरून स्वदेशी झोहो मेलवर शिफ्ट; म्हणाले- आता या आयडीवर मेल पाठवा; श्रीधर वेम्बूंनी तयार केले झोहो मेल

    Bihar : बिहार विधानसभा निवडणूक रालोआत जागावाटपावरून रस्सीखेच, 15 जागा नसल्यास लढणार नाही-जितन राम, मी रागावलो असे म्हणणे चुकीचेच- चिराग

    Nobel Prize : जपान, अमेरिका-ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांना रसायनशास्त्रातील नोबेल; नवीन अणू डिझाइन विकसित