• Download App
    Siddaramaiah सिद्धरामय्यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा; पण राज्यसभेचे खासदारकी नाकारून कर्नाटकातल्या सत्तेच्या चाव्या स्वतःच्याच ताब्यात ठेवण्याचा "डाव"!!

    सिद्धरामय्यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा; पण राज्यसभेचे खासदारकी नाकारून कर्नाटकातल्या सत्तेच्या चाव्या स्वतःच्याच ताब्यात ठेवण्याचा “डाव”!!

    नाशिक : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काँग्रेस श्रेष्ठींच्या सूचनेनंतर राजीनामा दिला खरा, पण राज्यसभेची खासदारकी नाकारून त्यांनी कर्नाटकातल्या सत्तेच्या चाव्या स्वतःच्याच ताब्यात ठेवण्याचा “डाव” खेळला.

    काँग्रेस श्रेष्ठींनी सिद्धरामय्या यांचा राजीनामा घेऊन त्यांच्या जागी शिवकुमार यांना मुख्यमंत्री करून काँग्रेसचे सरकार वाचविण्याचे चित्र सुरुवातीला निर्माण झाले होते. सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुद्धा दिला. पण त्याच वेळी त्यांनी काँग्रेस श्रेष्ठींनी त्यांना दिलेली राज्यसभेची खासदारकी नाकारली. आपल्याला केंद्रीय राजकारणात रस नाही आपण राज्यसभेवर जाऊन खासदार होण्यापेक्षा कर्नाटकात आमदार म्हणूनच काम करू, असे सिद्धरामय्या यांनी सगळ्या आमदारांशी बोलताना जाहीर केले.

    – राज्यसभेची जागा नाकारली

    काँग्रेस श्रेष्ठींना दिलेला शब्द आपण पाळला. त्यांच्या सूचनेनुसारच राजीनामा दिला, असे ते म्हणाले. पण त्याचवेळी राज्यसभेची खासदारकी नाकारून आणि कर्नाटकातच आमदार म्हणून राजकारण करण्याचे सांगून सिद्धरामय्या यांनी राज्याच्या राजकारणात नवा राजकीय स्फोट केला. कारण नवे मुख्यमंत्री शिवकुमार यांच्या कारभारात सिद्धरामय्या यांचा हस्तक्षेप वाढण्याची शक्यता त्यातून निर्माण झाली.

    – काँग्रेस श्रेष्ठींपुढे नवा पेच

    काँग्रेस श्रेष्ठींनी सिद्धरामय्या यांचा राजीनामा घेऊन त्यांना राज्यसभेत पुनर्वसित करायचे ठरविले होते. त्यामुळे कर्नाटकात शिवकुमार यांना मुख्यमंत्री म्हणून स्वतंत्रपणे कारभार करायची सोय काँग्रेसच्या श्रेष्ठींनी करून दिली होती. पण सिद्धरामय्या यांनी राज्यसभेची जागा नाकारून काँग्रेस श्रेष्ठींच्याच राजकीय तोडग्याला सुरुंग लावल्याचे चित्र निर्माण झाले. सिद्धरामय्या आणि शिवकुमार हे दोघेही दिल्लीला जाऊन नव्याने चर्चा करणार असल्याचे सांगितले गेले त्यानुसार ते दिल्लीला सुद्धा रवाना झाले. पण त्याआधी सिद्धरामय्या यांनी राज्यसभेची सीट नाकारून काँग्रेसच्या श्रेष्ठींच्या पुढे सुद्धा नवा पेच निर्माण करून ठेवला. आता काँग्रेस श्रेष्ठी हा पेच कसा सोडवणार??, शिवकुमार यांना मोकळा हात देणार का??, असे सवाल निर्माण झाले असून भविष्यात त्यांची उत्तरे मिळणे अपेक्षित आहे.

    Siddaramaiah resigns as Chief Minister

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mundra port : गुजरातच्या मुंद्रा किनाऱ्यावर 118 किलो कोकेन जप्त; ₹1000 कोटींच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

    दोन राष्ट्रीय पक्षांना भाकऱ्या फिरविण्यात यश; पण प्रादेशिक पक्षांची सत्तेत आणि विरोधातही धडपड आणि तडफड!!

    Mamata Banerjee : कोलकात्यातील ईद कार्यक्रमातून ममता बॅनर्जी वादात; ‘सनातन धर्म’ वक्तव्यावर तक्रार, राजकारण तापले