• Download App
    सिद्धरामय्या मंत्रिमंडळाची 5 गॅरंटींना मंजुरी, 11 जून ते 15 ऑगस्टदरम्यान 4 योजना राबवणार; पाचव्यासाठी मागवले अर्ज Siddaramaiah Cabinet approves 5 guarantees, will implement 4 schemes between June 11 and August 15

    सिद्धरामय्या मंत्रिमंडळाची 5 गॅरंटींना मंजुरी, 11 जून ते 15 ऑगस्टदरम्यान 4 योजना राबवणार; पाचव्यासाठी मागवले अर्ज

    वृत्तसंस्था

    बंगळुरू : कर्नाटकातील काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत निवडणुकीपूर्वी दिलेल्या 5 आश्वासनांवर शिक्कामोर्तब केले आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीत या आश्वासनांची अंमलबजावणी यंदा 11 जूनपासून करण्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. Siddaramaiah Cabinet approves 5 guarantees, will implement 4 schemes between June 11 and August 15

    सिद्धरामय्या म्हणाले, मंत्रिमंडळाने जात-धर्माचा भेदभाव न करता 5 गॅरंटींची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मी आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी यावर स्वाक्षरी केली आहे. त्याची टाइमलाइनही आम्ही निश्चित केली आहे.

    11 जून ते 15 ऑगस्टदरम्यान 4 योजना राबविण्यात येणार आहेत, पाचव्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत

    1. सखी शक्ती योजना

    सर्व प्रथम, सखी शक्ती योजना 11 जूनपासून लागू होत आहे. याअंतर्गत कर्नाटकातील महिलांना राज्य परिवहन बसमधून राज्यात कुठेही मोफत प्रवास करता येणार आहे.

    2. गृह ज्योती योजना

    ही योजना 1 जुलैपासून लागू होत आहे. याअंतर्गत घरगुती ग्राहकांना 200 युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार आहे. मात्र, त्यापूर्वीचे बिल भरावे लागणार आहे.

    3. अन्न भाग्य योजना

    ही योजनादेखील 1 जुलैपासून लागू केली जाईल. याअंतर्गत सर्व बीपीएल कार्डधारकांना प्रति व्यक्ती 10 किलो धान्य दिले जाईल. भाजप सरकारमध्ये 5 किलो मिळत असे.



    4. गृह लक्ष्मी योजना

    ही योजना 15 ऑगस्टपासून लागू होणार आहे. याअंतर्गत कुटुंबातील महिला प्रमुखाला दरमहा 2 हजार रुपये मिळणार आहेत. 15 जून ते 15 जुलै या कालावधीत अर्ज मागविण्यात आले आहेत.

    5. युवा निधी योजना

    या योजनेअंतर्गत, बेरोजगार पदवीधरांना 3,000 रुपये आणि पदविकाधारकांना दोन वर्षांसाठी 1,500 रुपये मासिक भत्ता दिला जाईल. यासाठी सरकारने अर्ज मागवले आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी कधी होणार, याची तारीख देण्यात आलेली नाही.

    शपथविधीच्या दिवशी आश्वासनांवर झाली पहिली बैठक

    20 मे रोजी सरकार स्थापन झाल्यानंतर राहुल गांधी यांनी या आश्वासनांचा पुनरुच्चार केला होता. ते म्हणाले होते की, आमच्या सरकारचा शपथविधी झाला आहे. आतापासून थोड्या वेळाने मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ बैठक घेऊन या पाच आश्वासनांवर शिक्कामोर्तब करतील. शपथविधी समारंभानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी मंत्रालयात जाऊन मंत्रिमंडळाची बैठक घेतली. त्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात या 5 आश्वासनांची अंमलबजावणी करण्याची चर्चा झाली होती.

    Siddaramaiah Cabinet approves 5 guarantees, will implement 4 schemes between June 11 and August 15

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य