• Download App
    Siddaramaiah and Shivakumar दोघांत तिसरा यायची वाटली भीती, म्हणून कर्नाटकात झाली दोघांची "युती"!!

    दोघांत तिसरा यायची वाटली भीती, म्हणून कर्नाटकात झाली दोघांची “युती”!!

    नाशिक : दोघांत तिसरा यायची वाटली भीती, म्हणून कर्नाटकात झाली दोघांची “युती”!!, हेच खरे चित्र कर्नाटक आणि दिल्लीतून एकत्रित रित्या समोर आले.

    कर्नाटकात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यातले भांडण त्यांनी आज एकत्र न्याहारी करून मिटविले. त्यानंतर त्यांनी बंगलोर मध्ये एकत्र पत्रकार परिषद घेतली पण या दोघांचीही पत्रकार परिषद सुरू असताना दिल्लीत मंत्री प्रियांक खर्गे यांनी काँग्रेसचे अध्यक्ष आणि आपले वडील मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली.

    कर्नाटकात सिद्धरामय्या विरुद्ध डी. के. शिवकुमार असा सामना रंगला असताना काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल या संदर्भात मोठे चर्चा झाली. सिद्धरामय्या आणि शिवकुमार हे दोघेही एकमेकांना नको आहेत ना, मग हरकत नाही, तिसरा कुणीतरी मुख्यमंत्री म्हणून पाठवू, अशी काँग्रेस हायकमांड मध्ये चर्चा झाली. या चर्चेतून खुद्द काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचेच नाव कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदासाठी समोर आले. कर्नाटकात दलित नेत्याला मुख्यमंत्रीपदाची संधी द्यायची असेल तर मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासारखाच उत्तम नेता आहे. त्याचबरोबर पी. परमेश्वर यांच्यासारखाही नेता आहे, याची चर्चा दिल्लीतून पुढे आली. स्वतः मल्लिकार्जुन खर्गे सुद्धा आपली राजकीय कारकीर्द काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून संपण्यापेक्षा कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून संपवायला तयार झाले.



    – दोघांची एकत्रित पत्रकार परिषद

    हे सगळे राजकीय चित्र “दोघांत तिसरा आता सगळं विसरा” अशा सिनेमा सारखे झाले. सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री पदावरून हटवून त्यांच्या जागी शिवकुमार यांना नेमण्याऐवजी मल्लिकार्जुन खर्गे किंवा पी. परमेश्वर यांचीच नावे पुढे आली. त्यामुळे सिद्धरामय्या आणि शिवकुमार हे दोघेही हादरले. आपली राजकीय कारकीर्द आपल्याच भांडणात संपुष्टात येते की काय याची भीती त्यांना वाटली. त्यामुळे त्यांनी आज सकाळी एकत्र न्याहारी केली आपापसातले मतभेद मिटवून टाकले. म्हणजे निदान तसेच चित्र निर्माण केले आणि ते चित्र खरे आहे, असे दाखविण्यासाठी त्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. भाजप आणि जेडीएस या विरोधकांना आम्ही एकत्रितरीत्या सामोरे जाऊ 2028 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुका सुद्धा आम्ही एकजुटीने लढवू. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकजूट टिकवू, अशी एकापाठोपाठ एक आश्वासने या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना आणि पत्रकारांना दिली.

    पण प्रत्यक्षात दोघांत तिसरा यायची वाटली भीती म्हणून झाली दोघांची “युती”!!, हेच खरे राजकीय चित्र बंगलोर आणि दिल्लीतून एकत्रित रित्या समोर आले.

    Siddaramaiah and Shivakumar patch up in Karnataka

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    World Hindu Economic forum : नवोन्मेष, आत्मनिर्भरता आणि समृद्धीचा भारतीय मार्ग हिंदू नीती अर्थव्यवस्थेच्या विचार पद्धतीत!!

    IndiGo CEO Pieter : इंडिगो CEO म्हणाले- सर्वात वाईट काळ निघून गेला; ऑपरेशन स्टेबल, नेटवर्कमधील 2200 विमानांची सेवा पूर्ववत

    काँग्रेसमध्ये प्रादेशिक पक्षांच्या विलीनीकरणाची भाषा करणाऱ्या काकांवर पुतण्याच्या प्रादेशिक पक्षात स्व पक्ष विलीनीकरणाची वेळ, ती सुद्धा अमित शाहांच्या परवानगीने!!