• Download App
    Shyamaprasad Mukherjee श्यामाप्रसाद मुखर्जींची 125 वी जयंती स्वातंत्र्याच्या 79 वर्षांनी ठरली सार्थक!!

    श्यामाप्रसाद मुखर्जींची 125 वी जयंती स्वातंत्र्याच्या 79 वर्षांनी ठरली सार्थक!!

    जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची 125 वी जयंती आज स्वातंत्र्याच्या 79 वर्षांनी सार्थक ठरली!! कारण भारताला खंडित स्वरूपात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 79 वर्षांनी शामाप्रसाद मुखर्जींचे एक महत्त्वाचे स्वप्न त्यांच्या राज्यात साकार झाले.

    श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जयंती नियमितपणे साजरी होतच होती. त्यांचे समर्थक आणि त्यांचे अनुयायी थोड्याफार प्रमाणात जयंती साजरी करतच होते. त्यामध्ये चढ-उतार सुद्धा होत राहिले. अनेक ठिकाणी श्यामाप्रसाद मुखर्जी लोकांच्या स्मृतीतून विसरले देखील गेले होते. यासाठी श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे कर्तृत्व कारणीभूत ठरले नव्हते, तर त्यासाठी प्रतिकूल राजकीय परिस्थिती कारणीभूत ठरली होती. श्यामाप्रसाद मुखर्जी देशाच्या अखंडतेचा ध्यास घेतला होता. जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य भाग करण्यासाठी कष्ट उपसले होते. त्याचबरोबर भारताच्या फाळणीच्या वेळी बंगाल आणि पंजाब या दोन प्रांतांची फाळणी करून तिथल्या हिंदूंचे संरक्षण करण्याची भूमिका आणि जबाबदारी घेतली होती. ती बऱ्याच अंशी पार सुद्धा पडली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या अत्यंत आग्रही भूमिकेमुळे संपूर्ण पंजाब आणि संपूर्ण बंगाल पाकिस्तानात जाण्यापासून वाचले. दोन्ही प्रांतांची फाळणी करून पूर्व पंजाब आणि पश्चिम बंगाल भारतात समाविष्ट झाले.



    – सन्मानाच्या ऐवजी बलिदान वाट्याला

    पण स्वातंत्र्यानंतर श्यामाप्रसाद मुखर्जींच्या वाट्याला मान सन्मान येण्याच्या ऐवजी बलिदान आले. त्यांना त्यांच्याच राज्यात म्हणजे पश्चिम बंगाल मध्ये राजकीय दृष्ट्या विस्मृतीत जावे लागले. पश्चिम बंगाल मधल्या आधीच्या काँग्रेस राजवटीने नंतरच्या कम्युनिस्ट राजवटीने आणि त्यानंतरच्या तृणमूळ काँग्रेसच्या राजवटीने श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे राजकीय आणि सामाजिक कर्तृत्वच नाकारले होते. ते पश्चिम बंगाल मधल्या जनतेच्या स्मृतीतून कायमचे नाहीसे व्हावेत, याची सगळी व्यवस्था त्या राजवटींनी केली होती. गेल्या 79 वर्षांमध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी आणि त्यांचे राजकीय तत्वज्ञान पराभूत झाले अशीच मांडणी केली गेली होती. पश्चिम बंगाल मध्ये एका भूमिपुत्राला त्याचा न्याय्य राजकीय हक्क नाकारला गेला होता.

    – 2014 नंतर बदलले चित्र

    पण 2014 नंतर टप्प्याटप्प्याने देशाचे राजकीय आणि सामाजिक चित्र बदलले. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याच अनुयायांनी देशात त्यांच्या राजकीय तत्त्वज्ञानासाठी अनुकूलता निर्माण केली. त्यासाठी त्यांनी भरपूर कष्ट उपसले. देशात भाजपची राजवट आणली. त्यामुळे श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या राजकीय तत्वज्ञानाला आणि कर्तृत्वाला न्याय मिळायला सुरुवात झाली. पण तो न्याय सुद्धा गेल्या 12 वर्षांमध्ये अपुरा राहिला होता. कारण श्यामाप्रसादांची जन्मभूमी आणि कर्मभूमी त्यांच्या तत्त्वज्ञानापासून आणि अनुयायांच्या राजवटी पासून दूर राहिली होती. 2026 मध्ये ही उणीव दूर झाली. पश्चिम बंगालच्या जनतेने अखेर श्यामाप्रसाद मुखर्जींचे राजकीय आणि सामाजिक तत्त्वज्ञान स्वीकारले. श्यामाप्रसाद मुखर्जींच्या अनुयायांना सन्मानाने कौल देऊन सत्तेवर बसविले. पश्चिम बंगालच्या निर्मिती मागचा हेतू तिथल्या जनतेने सफल केला. ज्याविषयी श्यामाप्रसाद मुखर्जी 80 वर्षांपूर्वी आग्रही राहिले होते, त्या हिंदू हिताचे सरकार पश्चिम बंगाल मध्ये आल्याने श्यामाप्रसाद मुखर्जींची राजकीय आणि सामाजिक उपेक्षा थांबली. त्यांच्या राजकीय आणि सामाजिक तत्त्वज्ञानाला आणि कर्तृत्वाला पश्चिम बंगालच्या जनतेने खऱ्या अर्थाने कौल दिला. त्यामुळे श्यामाप्रसाद मुखर्जींची 125 वी जयंती भारतीय स्वातंत्र्याच्या 79 वर्षांनी सार्थक ठरली!!

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातल्या सहकार्यांनी त्याचबरोबर अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी श्यामाप्रसाद मुखर्जींना राजकीय आणि सामाजिक अर्थपूर्ण आदरांजली वाहिली!!

    Shyamaprasad Mukherjee’s 125th Birth Anniversary

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Madhya Pradesh : देशात पहिल्यांदाच वक्फ बोर्डात 2 हिंदू सदस्य; मध्य प्रदेश सरकारने मनोज मालपाणी आणि अनिमेष भार्गव यांना सदस्य बनवले

    राम मंदिरात चोरी करणाऱ्यांना कठोरातले कठोर शासन करा; राम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपालदास यांचे पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगींना पत्र!!

    अग्निवीरांना सैन्यात कायमची नोकरी; तिन्ही दलांचा सरकारकडे प्रस्ताव; सकारात्मक निर्णयाची अपेक्षा!!