विशेष प्रतिनिधी
अयोध्या : अयोध्येत श्रीराम जन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी जोरदार सुरू असताना देशभर प्रचंड उत्साह आहे. या पार्श्वभूमीवर श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने अयोध्येतील राम मंदिराची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra Trust enlists the features of the Ayodhya Ram temple
ती अशी :
तीन मजली राम मंदिर पारंपारिक नगर शैलीमध्ये बांधले गेले आहे आणि त्याची लांबी (पूर्व-पश्चिम) 380 फूट, रुंदी 250 फूट आणि एक आहे. 161 फूट उंची. मंदिराचा प्रत्येक मजला 20 फूट उंच आहे. त्याला एकूण 392 खांब आणि 44 दरवाजे आहेत.
• तळ मजला – रामलल्ला प्रतिष्ठापना,
• पहिला मजला – राम दरबार (रामराजा, सीतामाई, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, हनुमान व राम दरबार )
• दुसरा मजला – सध्या काही नाही
• बांधकाम चालूच राहील आणि मंदिर पूर्ण होऊन कलश स्थापना २०२५ मध्ये होईल
• ५ मंडप सभा कीर्तनासाठी
• पाया :- काळा ग्रॅनाईट (कर्नाटक)
• पहिला मजला : गुलाबी आणि पांढरा ग्रॅनाईट (राजस्थान )
• सागवानी दरवाजे ४४ : महाराष्ट्र विदर्भ
• मंदिरासाठी खोदकाम चालू असताना दोन मंदिरे सापडली
१. ६ / ७ शताब्दी मधील २. २००० वर्षे पुराने
– विक्रमादित्य यांनी बांधलेले अवशेष
• मंदिराचे जोते :- (प्लिंथ ) १६ १/२ साडे सोळा फूट उंच
• मंदिरामध्ये सिमेंट, लोखंड सळई यांचा वापर नाही. दगडामध्ये दगड सांधलेले आहेत. आवश्यक तेथे तांबे भरलेले आहे. भूकंप रोधक रचना आहे
मंदिराची भौगोलिक रचना अशी आहे की दर वर्षी फक्त रामनवमीला सूर्यकिरण रामल्लांच्या मुखावर येतील
मंदिराचा इतिहास
• आत्तापर्यंत ७६ युद्धे, लाखो लोक लढलेले आहेत
• विशेष युद्ध :- अयोध्येच्या परिसरातील महिला सेनेने युद्ध केले आणि सर्व महिलांचे बलिदान दिले
• दुसरे युद्ध गुरु गोविंद सिंग, गुरु तेग बहादूर, गुरु नानक यांनीही केलेले युद्ध
• २२/१२/१९४९ ला आत्ता जिथे मूर्ती आहे तिथे वॉचमनला रात्री एक प्रकाश दिसला आणि तिथे मूर्ती दिसल्या
• नायर साहेब यांनी पूजेसाठी परवानगी दिली
• १९८४ मध्ये आंदोलनाला सुरुवात झाली. समाज जागरण, रथयात्रा
• १९८६ साली कुलूप उघडले गेले
• १९८९ शिलापूजन कार्यक्रम झाले. देशात २,७२,००० ठिकाणी शीला पूजन झाले
• १९९० कारसेवा – ३० ऑक्टो – २ नोव्हेंबर रोजी गोळीबार (मुलायम सिंग सरकार )
• ४ एप्रिल १९९१ दिल्ली मध्ये बोट क्लबवर प्रचंड मोठी सभा
• पादुका पूजन कार्यक्रम सुरु झाले
• ६ डिसेंबर १९९२ बाबरी ढाचा पाडला
• न्यायालयीन लढाई जिंकली
• ५ ऑगस्ट २०२० राममंदिर भूमिपूजन
– 22 जानेवारी 2024 रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra Trust enlists the features of the Ayodhya Ram temple
महत्वाच्या बातम्या
- द फोकस एक्सप्लेनर : हिट अँड रनचा वाद काय? भारतातल्या कायद्याला विरोध का? परदेशात कोणते कायदे? वाचा सविस्तर
- ‘अबकी बार 400 पार, तीसरी बार मोदी सरकार’, लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा नवा नारा!
- ‘हिट अँड रन’ कायद्याची सध्या अंमलबजावणी होणार नाही, संप मागे घेण्याचे आवाहन!
- मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व्हेक्षणाचे काम बिनचूक आणि कालबद्धरितीने व्हावे