• Download App
    ज्येष्ठी पौर्णिमेनिमित्त श्री अमरनाथ पूजा आणि यज्ञाचे आयोजन; यात्रा रद्द झाली तरी धार्मिक कार्यक्रम सुरू Shri Amarnathji Shrine Board CEO Nitishwar Kumar performed Pratham Pooja on the auspicious occasion of Jyeshta Purnima at the holy cave.

    ज्येष्ठी पौर्णिमेनिमित्त श्री अमरनाथ पूजा आणि यज्ञाचे आयोजन; यात्रा रद्द झाली तरी धार्मिक कार्यक्रम सुरू

    वृत्तसंस्था

    श्रीनगर – देशातल्या कोरोनाच्या प्रकोपामुळे केंद्र सरकारला पवित्र अमरनाथ यात्रा रद्द करावी लागली असली, तरी तेथील धार्मिक कार्यक्रम व्यवस्थित सुरू असून त्याला कोणताही अटकाव करण्यात आलेला नाही. Shri Amarnathji Shrine Board CEO Nitishwar Kumar performed Pratham Pooja on the auspicious occasion of Jyeshta Purnima at the holy cave.



    आज ज्येष्ठी पौर्णिमेनिमित्त श्री अमरनाथ पूजन पारंपरिक पध्दतीने धार्मिक रीतीने करण्यात आले. अमरनाथ देवस्थान बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीश्वर कुमार यांच्या हस्ते अमरनाथजींचे पूजन आणि आरती करण्यात आली. तसेच पवित्र गुहेत समंत्र यज्ञही करण्यात आला. या परंपरेत खंड पडला नाही. यावेळी अमरनाथ देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.

    कोरोनाच्या प्रकोपामुळे दरवर्षी होणारी अमरनाथ यात्रा यंदा दुसऱ्यांदा रद्द करावी लागली. त्यामुळे भाविकांमध्ये आणि काश्मीरी व्यापाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. परंतु, सरकारने अपरिहार्यतेतून हे निर्बंध लावल्याचे स्पष्ट केले आहे. आज धार्मिक परंपरेनुसार अमरनाथजींची ज्येष्ठी पौर्णिमेनिमित्त पूजा करण्यात आली.

    Shri Amarnathji Shrine Board CEO Nitishwar Kumar performed Pratham Pooja on the auspicious occasion of Jyeshta Purnima at the holy cave.

    Related posts

    National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण

    Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला

    Rahul Gandhi : यूपी निवडणूक आयोगाने राहुल गांधींचे दावे फेटाळले; कर्नाटक आयोगाने म्हटले- राहुल यांनी प्रतिज्ञापत्र द्यावे