• Download App
    बांगलादेशी – रोहिंग्या घुसखोर बंगाली युवकांचा रोजगार खेचतात, त्यांना बाहेर काढायला नको...??; अमित शहांचा परखड सवाल Shouldn't we stop infiltration in Bengal? Infiltrators take away jobs of our youth, snatch away foodgrain of the poor, asks amit shah

    Infiltrators take away jobs : बांगलादेशी – रोहिंग्या घुसखोर बंगाली युवकांचा रोजगार खेचतात, त्यांना बाहेर काढायला नको…??; अमित शहांचा परखड सवाल

    वृत्तसंस्था

    तेहट्टा – पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर येतात. इथल्या बंगाली युवकांचे रोजगार खेचतात. सरकारी योजनांमधले धान्य नेतात. अशा घुसखोरांना रोखायला नको का…, असा परखड सवाल केंद्रीय गृहमंत्री मित शहा यांनी तेहट्टा येथील जाहीर सभेत केला. Shouldn’t we stop infiltration in Bengal? Infiltrators take away jobs of our youth, snatch away foodgrain of the poor, asks amit shah

    मतदानाच्या पाचव्या टप्प्याच्या प्रचारात ते बोलत होते. बंगालमध्ये घुसखोरीची स्थिती एवढी भयानक आहे की तिचा उपद्रव फक्त बंगाललाच होत नाहीए, तर संपूर्ण देशाला होतो आहे. त्यामुळे घुसखोरांना शोधून इथून बाहेर काढायला पाहिजे आणि आम्ही सत्तेवर आल्यावर ते करू, असे अमित शहा यांनी सांगितले.



    इथे ७० वर्षांपासून नागरिकता मागत असलेल्या शरणार्थींना नागरिकता देण्यात येईल. अशी नागरिकता मिळालेल्या जनतेसाठी नव्या भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली १०० कोटी रूपयांचा फंड तयार करून त्यांच्यासाठी प्राधान्याने विकास योजना सुरू करण्यात येतील, असे आश्वासनही अमित शहा यांनी दिले.

    -राहुल गांधी टुरिस्ट नेते

    ममता बॅनर्जी यांनी मोदी – शहांवर गुजराती टुरिस्ट नेते अशी टीका केली होती. त्याला उत्तर देताना अमित शहा म्हणाले, की देशभर गाजत असलेले एक टुरिस्ट नेते परवाच बंगालमध्ये येऊन गेले. बाकी ठिकाणी राहुलबाबा कुठे दिसले नाहीत. त्यांनी भाजपच्या डीएनएवर टीका केली… पण राहुलबाबा, आम्हाला आमचा डीएनए माहिती आहे, डेव्हलपमेंट, नॅशनॅलिझम आणि आत्मनिर्भर भारत… पण ममता बॅनर्जी या देशा – परदेशात फिरणाऱ्या टुरिस्ट नेत्यावर बोलताना दिसल्या नाहीत, असे टीकास्त्रही अमित शहांनी सोडले.

    Shouldn’t we stop infiltration in Bengal? Infiltrators take away jobs of our youth, snatch away foodgrain of the poor, asks amit shah

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट