• Download App
    Ahmedabad plane crash अहमदाबाद विमान दुर्घटनेचा धक्कादायक अहवाल

    Ahmedabad plane crash : अहमदाबाद विमान दुर्घटनेचा धक्कादायक अहवाल, विमान हवेत असतानाच दोन्ही इंजिनचा इंधनपुरवठा बंद

    Ahmedabad plane crash

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : Ahmedabad plane crash  पुढारलेली तंत्रज्ञानं, प्रगत विमान आणि अनुभवी वैमानिक असूनही केवळ एका स्विचमुळे 260 निष्पाप जीवांचा बळी गेला हे वास्तव पुन्हा एकदा समोर आलं आहे. मागील महिन्यात अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया फ्लाइट AI171 या बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमानाच्या दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल भारताच्या विमान अपघात चौकशी विभागाने (AAIB) प्रसिद्ध केला आहे, आणि तो अतिशय धक्कादायक आहे.Ahmedabad plane crash

    विमान हवेत असतानाच दोन्ही इंजिन्समधील इंधनपुरवठा अचानक थांबतो, असे फाइट डेटा रेकॉर्डरद्वारे उघड झाले. कारण – फ्युएल कंट्रोल स्विचेस ‘RUN’ वरून ‘CUTOFF’ स्थितीत गेले होते. विशेष म्हणजे हे दोन्ही स्विच फक्त एका सेकंदाच्या अंतराने एकामागोमाग गेले. काही क्षणांनी स्विच पुन्हा ‘RUN’ वर आले, इंजिन्स पुन्हा सुरू होण्याचा प्रयत्न करतात – पण तो प्रयत्न निष्फळ ठरतो.



    विमानाचा वेग तेव्हा कमाल मर्यादेला पोहोचला होता. त्यानंतर केवळ काही क्षणांतच वैमानिकाचा “MAYDAY MAYDAY” असा धोक्याचा संदेश ऐकवतो आणि त्यानंतर फक्त शांतता – भयावह शांतता.

    FAA (Federal Aviation Administration) ने 2018 मध्ये Special Airworthiness Information Bulletin (SAIB) प्रसिद्ध करत काही बोईंग विमानांमधील फ्युएल स्विच लॉकिंग प्रणाली अनायासे निष्क्रिय होण्याची शक्यता वर्तवली होती.
    मात्र हा इशारा अनिवार्य नव्हता, त्यामुळे एअर इंडियाने यास गांभीर्याने घेतले नाही, आणि ही तपासणी न करण्याचा निर्णय घेतला.

    विशेष म्हणजे, AI171 च्या अपघातात हेच नेमकं घडलं – स्विच अनपेक्षितरीत्या ‘CUTOFF’ स्थितीत गेले, परिणामी इंधन थांबले आणि विमान कोसळले. AAIB अहवालात नमूद केल्याप्रमाणे, थ्रॉटल कंट्रोल मॉड्यूल्स 2019 आणि 2023 मध्ये बदलण्यात आले होते. कोणताही नियमभंग अथवा प्रक्रियात्मक चूक आढळून आलेली नाही, असे म्हटले जाते. पण तरीही या बदलांदरम्यान FAA चा सल्ला का न पाळला गेला, यावरून देखभाल व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण होतात.

    या अहवालातील सर्वात थरकाप उडवणारी बाब म्हणजे कॉकपिटमधील अंतिम संवाद.
    एक पायलट दुसऱ्याला विचारतो. “तू इंधन का बंद केलंस?”उत्तर येतं. “मी नाही केलं…”

    हा संवाद एकतर मानवी चूक, तांत्रिक बिघाड किंवा स्वयंचलित प्रणालीतील दोष दर्शवतो. पण कोणती गोष्ट खरी आहे, याचा AAIB कडून अंतिम निष्कर्ष अद्याप दिला गेलेला नाही.

    बोईंग कंपनीने निवेदन जारी करून चौकशीस सहकार्याची ग्वाही दिली आणि अपघातग्रस्त कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या.
    एअर इंडियानेही “सर्व नियमांचे पालन करण्यात आले असून, SAIB फक्त एक सल्ला होता” असे स्पष्ट केले. तसेच भविष्यात सुरक्षितता सुधारण्यासाठी नव्या उपाययोजना राबवण्याचे आश्वासन दिले आहे.

    Shocking report of Ahmedabad plane crash, fuel supply to both engines stopped while the plane was in the air

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Arunachal Pradesh : रेप-छेडछाडीच्या आरोपीची जमावाकडून पोलिस ठाण्याबाहेर हत्या; 20हून अधिक अल्पवयीन मुलींचे शोषण

    बिहारमध्ये मतदार यादीत आढळले बांगलादेशी, म्यानमारी आणि नेपाळी; पण शेतकरी आणि अल्पसंख्यांकांचे लेबल लावून काँग्रेस लढणार त्यांच्यासाठी!!

    राज्यसभा निवडणुकीसाठी खरी चुरस 2026 मध्ये; कारण निवृत्त होणाऱ्यांमध्ये पवार, देवेगौडा, दिग्विजय सिंह आणि खर्गे!!; पवार पुढे काय करणार??